मराठी बातम्या /बातम्या /विदेश /सॅटेलाईट इमेजमुळे चीनची पोलखोल; वाळवंटात आढळले 100 हून अधिक मिसाइल सायलो, नेमका प्लॅन काय?

सॅटेलाईट इमेजमुळे चीनची पोलखोल; वाळवंटात आढळले 100 हून अधिक मिसाइल सायलो, नेमका प्लॅन काय?

आंतरखंडीय क्षेपणास्त्र म्हणजे एका खंडातून दुसऱ्या खंडापर्यंत लांब जाण्याची क्षमता असलेलं क्षेपणास्त्र. चीनकडे असलेली क्षेपणास्त्रं अमेरिकेपर्यंत जाऊ शकतात, एवढ्या क्षमतेची आहेत.

आंतरखंडीय क्षेपणास्त्र म्हणजे एका खंडातून दुसऱ्या खंडापर्यंत लांब जाण्याची क्षमता असलेलं क्षेपणास्त्र. चीनकडे असलेली क्षेपणास्त्रं अमेरिकेपर्यंत जाऊ शकतात, एवढ्या क्षमतेची आहेत.

आंतरखंडीय क्षेपणास्त्र म्हणजे एका खंडातून दुसऱ्या खंडापर्यंत लांब जाण्याची क्षमता असलेलं क्षेपणास्त्र. चीनकडे असलेली क्षेपणास्त्रं अमेरिकेपर्यंत जाऊ शकतात, एवढ्या क्षमतेची आहेत.

नवी दिल्ली 09 जुलै : जगाला आपलं सामर्थ्य आणि उपद्रवमूल्य दाखवून देण्याच्या सतत प्रयत्नात असलेल्या चीनने (China) आता आण्विक क्षेपणास्त्र डागण्याची आपली क्षमता वृद्धिंगत करण्यास सुरुवात केली आहे. आंतरखंडीय क्षेपणास्त्र डागण्यासाठी आवश्यक असलेले सायलो (Missile Silos) अर्थात विशिष्ट प्रकारचे खड्डे चीनमधल्या वायव्येकडच्या युमेन (Yumen) शहराजवळच्या वाळवंटात (Desert) तयार करण्यात आले असल्याचं उपग्रहाने टिपलेल्या प्रतिमांमधून (Satellite Images) स्पष्ट झालं आहे. अशा प्रकारचे 119 सायलो तिथे असल्याचं दिसून आलं आहे. चीनच्या आण्विक कार्यक्रमातला हा मोठा टप्पा असल्याचं मानलं जात आहे. वॉशिंग्टन पोस्टसारखी आंतरराष्ट्रीय माध्यमं, पीटीआयसारख्या वृत्तसंस्था आणि तज्ज्ञांची ट्विट्स आदींच्या हवाल्याने 'आज तक'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

कॅलिफोर्नियामधल्या (California) मॉन्टेरी इथल्या जेम्स मार्टिन सेंटर फॉर नॉन-प्रॉलिफरेशन स्टडीज या संस्थेतल्या शास्त्रज्ञांनी प्लॅनेट लॅब्जच्या (Planet Labs) व्यावसायिक उपग्रहाच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या प्रतिमांच्या अभ्यासातून चीनच्या या हालचालीबद्दलची माहिती मिळवली आहे. प्लॅनेट लॅब्जचे सहसंस्थापक आणि सीईओ विल मार्शल यांनी याबद्दल ट्विट केलं आहे. मार्शल यांच्या ट्विटमध्ये दोन फोटो असून, त्यात सायलो स्पष्टपणे दिसत आहेत. 'गेल्या वर्षी चीनने 100हून अधिक उईघुर डिटेंशन कँप्स तयार केले होते. यावर्षी आण्विक क्षेपणास्त्रांसाठी 100 हून अधिक सायलो तयार करण्यात आले आहेत. हे तयार करण्याचं काम खूपच वेगाने होत असल्याचं उपग्रहांनी टिपलेल्या प्रतिमांवरून स्पष्ट होत आहे,' असं विल मार्शल यांनी लिहिलं आहे.

थोरात-राऊतांच्या दिल्लीवारीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

मिसाइल सायलो म्हणजे एक दंडगोलाकार (म्हणजे सिलिंडरसारख्या आकाराचा), खोल खड्डा असतो. इंटरकॉन्टिनेन्टल न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाइल (Intercontinental Nuclear Ballistic Missile - ICBM) अर्थात आंतरखंडीय आण्विक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र त्यात ठेवलं जातं आणि वरून झाकण लावून ठेवलं जातं. जेव्हा वेळ येईल तेव्हा, त्याचं झाकण उघडून तिथूनच क्षेपणास्त्र डागलं जातं. आंतरखंडीय क्षेपणास्त्र म्हणजे एका खंडातून दुसऱ्या खंडापर्यंत लांब जाण्याची क्षमता असलेलं क्षेपणास्त्र. चीनकडे असलेली क्षेपणास्त्रं अमेरिकेपर्यंत जाऊ शकतात, एवढ्या क्षमतेची आहेत. सध्या चीनने वाळवंटात केलेल्या 119 सायलोमध्ये क्षेपणास्त्रं आहेत का आणि क्षेपणास्त्रं असली, तर त्यावर अण्वस्त्रं आहेत का, याबद्दलची माहिती मिळालेली नाही.

चीनने खूपच वेगाने हे काम केलं आहे. कारण जानेवारी 2021पर्यंत इथे काही हालचाल दिसत नव्हती. केवळ वैराण वाळवंट होतं. आता मात्र 119 मिसाइल सायलो तयारही झाले आहेत. तिथे आण्विक क्षेपणास्त्रं ठेवली जाणार आहेत किंवा कदाचित ठेवण्यात आलेलीही असू शकतात. चीनकडे 250 ते 350 अण्वस्त्रं असून, अण्वस्त्रांच्या संख्येच्या बाबतीत चीनचा जगात पाचवा क्रमांक लागतो.

पत्रकार परिषद घेऊन पंकजा मुंडेंनी दिला चर्चांना पूर्णविराम, म्हणाल्या...

चीनकडे असलेल्या ICBM ची संख्या 50 ते 75 असून, त्यांच्याकडच्या चार पाणबुड्या अण्वस्त्रयुक्त क्षेपणास्त्रांनी सज्ज आहेत. अशा पाणबुड्यांची संख्या लवकरच दुप्पट करण्याचे चीनचे प्रयत्न सुरू आहेत. चीनकडे H-6 नावाची बॉम्बवर्षाव करणारी यंत्रणाही आहे. अण्वस्त्र वाहून नेण्याचीही त्या यंत्रणेची क्षमता आहे. बॉम्बवर्षाव करणारी Xian H-20 नावाची एक अत्याधुनिक यंत्रणाही चीन तयार करत आहे. त्यावरून अणुबॉम्ब, तसंच अण्वस्त्रसज्ज क्रूझ मिसाइल्सही डागता येऊ शकतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

अमेरिकेकडे 5800 अण्वस्त्रं असून, त्यापैकी 1373 अण्वस्त्रं क्षेपणास्त्रं, पाणबुड्या आणि अन्य ठिकाणी कायमच तैनात असतात. रशियाकडे 6375 अण्वस्त्रं असून, त्यापैकी 1326 कायम सज्ज असतात.

First published:
top videos

    Tags: Ballistic missiles, China