मराठी बातम्या /बातम्या /पुणे /आमच्या पक्षात काही वाद नाहीत, थोरात-राऊतांच्या दिल्ली भेटीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

आमच्या पक्षात काही वाद नाहीत, थोरात-राऊतांच्या दिल्ली भेटीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Nana Patole: थोड्याच वेळात थोरात आणि राऊत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची 10 जनपथ निवासस्थानी भेट घेणार आहेत.

Nana Patole: थोड्याच वेळात थोरात आणि राऊत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची 10 जनपथ निवासस्थानी भेट घेणार आहेत.

Nana Patole: थोड्याच वेळात थोरात आणि राऊत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची 10 जनपथ निवासस्थानी भेट घेणार आहेत.

पुणे, 09 जुलै: महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat)आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) दिल्लीत दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात थोरात आणि राऊत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची 10 जनपथ निवासस्थानी भेट घेणार आहेत. राज्यात सुरू असलेल्या पक्षाअंतर्गत कुरबुरीची तक्रार करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान या दिल्लीवारीवर काँग्रेस (Congress)प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आमच्या पक्षात काही वाद नाहीत. दिल्लीत मंत्री त्यांच्या कामानिमित्ताने जात असतात. तसेच नितीन राऊत आणि बाळासाहेब थोरात गेले असावेत. नितीन राऊत ऊर्जा मंत्री आहेत, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या परिस्थितीत 2 दिवसांच्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षची निवड शक्य नव्हती, असंही त्यांनी सांगितलं आहे. महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्यावर मी ठाम आहे. तथापि स्थानिक नेत्यांशी बोलून चाचपणी केली जाईल. नंतर योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, असंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.

काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद

नाना पटोले आणि मंत्री नितीन राऊत यांच्यातील वाद आता दिल्लीत पोहोचला आहे. पटोलेंशी झालेल्या मतभेदामुळे नितीन राऊत पक्षश्रेष्ठींना भेटण्यासाठी दिल्लीत दाखल झालेत. पटोले आणि राऊत यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष काँग्रेसला मिळालं नाही. यावरून काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

हेही वाचा-पत्रकार परिषद घेऊन पंकजा मुंडेंनी दिला चर्चांना पूर्णविराम, म्हणाल्या...

नाना पटोले यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

केंद्रात खातेबदल झाले नवीन मंत्री झाले. पण डबे कितीही बदललेले तरी काही उपयोग नाही इंजिन बदलणे गरजेच आहे, देशाच्या हिताचे आहे.

केंद्र सरकारच्या व्यवस्थेचा लोकांना त्रास होत आहे. त्यामुळे आमचं आंदोलन सुरू आहे. काँग्रेस एक विचार आहे. स्वातंत्र्य अगोदरपासून काँग्रेस आहे. राहुल गांधी यांनी जीएसटी आणि नोटाबंदीवर आवाज उठवला तर त्यांची खिल्ली उडवली पण आता खरं वाटत आहे.

काँग्रेसमध्ये वाद नाही. पुण्यात महापालिका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू आहे. त्याची चाचपणी सुरू आहे.

भाजप ओबीसी विरोधात आहे.अधिवेशनात जे झालं ते भाजपच्या नेत्यांचं तोल सुटल्यानं.

मोदी सरकारने सीबीआय आणि ईडीचं महत्व क्षुल्लक करून ठेवलं आहे.

काँग्रेस हे केंद्राने बनवलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधातच आहे.

First published:
top videos

    Tags: Congress, Nana Patole, Nitin raut