मराठी बातम्या /बातम्या /विदेश /लांब केस ठेवणंही गुन्हा? पाकिस्तानी कलाकाराला झालेल्या अटकेमुळे उडाला गोंधळ

लांब केस ठेवणंही गुन्हा? पाकिस्तानी कलाकाराला झालेल्या अटकेमुळे उडाला गोंधळ

मधुच्या अटकेमागील कारण नेमकं काय असावं असा प्रश्न कदाचित अनेकांना पडेल. मात्र, हे कारण काहीही गुन्हा नव्हता, तर आपल्या लांब केसांमुळे पोलिसांनी त्याला अटक (artist gets arrested by police for having long hair) केली.

लाहोर 15 जून: अबूझर मधु नावाच्या पाकिस्तानातील एका कलाकार आणि कलावंताला लाहोर पोलिसांनी नुकतंच ताब्यात घेतलं (Pakistani artist gets arrested in Lahore) आहे. सकाळी अकराच्या सुमारास तो रिक्षाची वाट पाहत होता, याचवेळी पोलीस त्याच्यासमोर येऊन उभा राहिले आणि त्याला ताब्यात घेतले. मधुच्या अटकेमागील कारण नेमकं काय असावं असा प्रश्न कदाचित अनेकांना पडेल. मात्र, हे कारण काहीही गुन्हा नव्हता, तर आपल्या लांब केसांमुळे पोलिसांनी त्याला अटक (artist gets arrested by police for having long hair) केली.

पोलिसांनी त्याला केवळ पोलीस ठाण्यात नेलं नाही. तर, इथे गेल्यानंतर तो एखादा संशयित असल्याप्रमाणे त्याची बॅग आणि इतर सामानाचीही तपासणी केली. मधुचा गजाआडचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे. अलिया हैदर नावाच्या एका स्थानिक सामाजिक कार्यकर्तीनं हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं, की कलाकार अबुझर मधु याला लाहोरच्या रस्त्यावर चालत असताना पोलिसांनी अटक केली. तो संशयित आहे आणि त्याच्या बॅगचीही तपासणी करण्यात आली आहे. यानंतर त्याला पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आलं.

हनीमूनला जाताच पतीचं सत्य आलं समोर, आता पत्नीचे कपडे अन् दागिने घालून बनणार नवरी

व्हाईस न्यूजच्या वृत्तानुसार, अबुझार मधूने असे सांगितले, की तो असा का दिसतो किंवा राहातो हे पोलिसांना समजू शकले नाही. त्यानं आपले केस रबरनं बांधले होते, आता हातात एक बांगडीदेखील घातली होती, याच कारणामुळे पोलिसांच्या नजरेत तो संशयित झाला. त्यानं आपण एक कलाकार असल्यानं असं राहात असल्याचं सिद्ध कऱण्यासाठी कागपत्रंही दाखवली, मात्र तरीही आम्ही तुला शिस्त लावू, असं पोलिसांनी त्याला म्हटलं.

बेपत्ता मुलगी सापडली, अपहरणकर्त्याचा उद्देश ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

हैदरचं ट्विट केवळ पाकिस्तानात नाही तर संपूर्ण जगभरात व्हायरल झालं आहे. यावर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. केवळ त्याच्या दिसण्यामुळे आणि राहणीवरुन पोलिसांनी दिलेल्या या वागणुकीबाबत नेटकऱ्यांनी खंत व्यक्त केली आहे. एका युजरनं कमेंट करत म्हटलं आहे, की त्याच्यावर अन्याय झालेला असतानाही त्याच्या चेहऱ्यावरील हसू कायम आहे.

First published:
top videos

    Tags: Pakistani, Police arrest