न्यूयॉर्क, 31 मार्च : लिंचिंगचा (Lynching) स्वतःचा एक इतिहास आहे. गेल्या काही वर्षांत, त्याचे प्रमाण आणि स्वरूप जगाच्या अनेक भागांमध्ये विस्तारत असल्याचे दिसून आले आहे. पुन्हा एकदा लिंचिंग चर्चेत आलं आहे. परंतु, यावेळी कोणाची हत्या झाली म्हणून नाही तर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी त्याविरोधात कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. आता हा पहिला यूएस कायदा आहे, ज्यामध्ये वांशिक लिंचिंगला द्वेषपूर्ण गुन्हा म्हणून वर्गीकृत करण्यात आलं आहे. अलीकडे अमेरिकेत लिंचिंगच्या घटनांनी जोर धरला होता. मात्र, त्याविरोधात कठोर कायदे करण्याची मागणी शतकानुशतके सुरू आहे. लिंचिंग काय आहे? लिंचिंग म्हणजे न्यायाची योग्य प्रक्रिया न करता केलेली हत्या. सामान्यतः एखाद्या व्यक्तीला शिक्षा करण्याच्या उद्देशाने अनौपचारिक गटाने केलेला खून असतो. हे अनौपचारिक सामाजिक गटाच्या नियंत्रणाचे अंतिम स्वरूप आहे. सामान्यतः लिंचिंग म्हणजे मॉब लिंचिंग ज्याला आपण झुंडबळी म्हणू शकतो. लिंचिंग आणि अमेरिका लिंचिंग या शब्दाचा उगम अमेरिकेत झाला. अमेरिकेच्या दक्षिण भागात आफ्रिकन अमेरिकन लोकांच्या लिंचिंगच्या घटना अमेरिकन गृहयुद्धानंतरच्या सामंजस्यानंतरच्या काळात अधिक वारंवार होत होत्या. 1877 ते 20 व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत ते त्याच्या शिखरावर होते, जेव्हा वंशवाद आणि हिंसाचार त्यांच्या शिखरावर होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन म्हणाले की, “शुद्ध दहशतवाद” विरुद्धचा कायदा शतकाहून अधिक काळ रखडला होता. मुलाच्या नावावर कायद्याचं नाव कायद्याला एम्मेट टिल अँटी-लिंचिंग कायदा असे नाव दिले जाईल, ज्याचे नाव 14 वर्षांच्या कृष्णवर्णीय मुलाच्या नावावर आहे. 1950 च्या दशकात अमेरिकन नागरी हक्क चळवळीत मिसिसिपी राज्यात या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. हा कायदा या महिन्याच्या सुरुवातीला सिनेटने मंजूर केला होता आणि बायडेन यांनी मंगळवारी त्यावर स्वाक्षरी केली.
एक शुद्ध दहशत बायडेन कायद्यावर स्वाक्षरी करत असताना, उपाध्यक्ष कमला हॅरिस, न्याय विभागाचे उच्च अधिकारी, लिंचिंगची बातमी देणारा कृष्णवर्णीय पत्रकार आणि टिलचा भाऊ रेव्ह व्हीलर पार्कर देखील उपस्थित होते. बायडेन यावेळी म्हणाले की, लिंचिंग हा निव्वळ दहशतवाद आहे, जो प्रत्येकजण अमेरिकेचा असू शकत नाही, प्रत्येकजण समान बनलेला नाही, असे भासवण्यासाठी खोटं पसरवलं जातं. टिलच्या नावाने कायदा का? या कायद्यानुसार दोषी आढळलेल्या व्यक्तीला 30 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल. एम्मेट टिल खून प्रकरण हे लिंचिंगचे विशेष प्रकरण होते. ऑगस्ट 1955 मध्ये मिसिसिपीमध्ये टिलचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. एका गोर्या महिलेने आरोप केला आहे की, एका दुकानात मुलाने तिचा विनयभंग केला. काही दिवसांनी टिलचा मृतदेह नदीत सापडला. Russia-Ukraine युद्धाचा भारतातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा, जाणून घ्या कसा हा खटला विशेष का बनला? ही हत्या नागरी हक्कांच्या दृष्टीने कलाटणी देणारी ठरली. कॅरोलिन ब्रायंटचा नवरा रॉय ब्रायंट आणि जे. डब्ल्यू. मिलम या दोन गोर्या पुरुषांवर खुनाचा आरोप होता. पण सर्व गोरे न्यायाधीश असलेल्या ज्युरींनी त्यांना सोडून दिले. आश्चर्याची बाब म्हणजे या दोघांनी एका मुलाखतीत हत्येची कबुली दिली होती. अमेरिकेच्या पहिल्या कृष्णवर्णीय आणि आशियाई अमेरिकन उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी कॅलिफोर्नियातून यूएस सिनेटर असताना या विधेयकाचे सहप्रायोजकत्व केले. त्या यावेळी म्हणाल्या की, लिंचिंग हे जुन्या काळाचे अवशेष नाहीत. अमेरिकेत आजही अशा दहशतीच्या घटना घडतात. असे झाल्यावर त्याचे नाव घेऊन कायद्यासमोर आणण्याचे धाडस आपण सर्वांनी केले पाहिजे. त्याच वेळी, बायडेन यांनी लिंचिंगविरोधी जनमतावर भर दिला.