Home /News /national /

Russia-Ukraine युद्धाचा भारतातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा, जाणून घ्या कसा

Russia-Ukraine युद्धाचा भारतातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा, जाणून घ्या कसा

Russia-Ukraine War and Farmers Benefit : रशिया आणि युक्रेन (Russia-Ukraine) हे दोन्ही गव्हाचे प्रमुख उत्पादक (Wheat Producer) देश आहेत. सध्या हे दोघेही युद्धात अडकले आहेत. त्यामुळं तिथून गव्हाचा पुरवठा खंडित झाल्यामुळं किंमती एमएसपीपेक्षा कितीतरी जास्त वाढतील.

पुढे वाचा ...
    चंदीगड, 30 मार्च : रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे (Russia-Ukraine War) यावेळी गहू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा नफा मिळू शकतो. या युद्धामुळे जागतिक स्तरावर गव्हाचा तुटवडा (Wheat Shortage) निर्माण होऊ शकतो, असा अंदाज आहे. त्यामुळं खासगी व्यापारी शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किमतीपेक्षा (MSP) जास्त दरानं गहू खरेदी करू शकतात. राज्यातील विविध मंडईतील कमिशन एजंट सांगतात की, गव्हाच्या जुन्या साठ्याचा बाजारभाव 2,250 ते 2,300 रुपये प्रति क्विंटल आहे. तर, यावर्षी गव्हाची किमान आधारभूत किंमत (MSP) 2,015 रुपये प्रति क्विंटल आहे. रशिया आणि युक्रेन (Russia-Ukraine) हे दोन्ही गव्हाचे प्रमुख उत्पादक (Wheat Producer) देश आहेत. सध्या हे दोघेही युद्धात अडकले आहेत. त्यामुळं तिथून गव्हाचा पुरवठा खंडित होणार आहे. अशा परिस्थितीत, किंमती एमएसपीपेक्षा कितीतरी जास्त वाढतील. त्यामुळं प्रत्येक शेतकरी त्यांच्याकडचा गहू खुल्या बाजारात जास्त दरानं विकण्यासाठी सध्या त्याचा साठा करून ठेवू शकतो. ते यावेळी त्यांचा सर्व गहू सरकारी संस्थांना विकणार नाहीत. कारण, यावेळी गव्हाचा भाव अडीच हजार ते तीन हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत असू शकतो, अशी त्यांची अपेक्षा आहे. द ट्रिब्यूनमधील एका रिपोर्टमध्ये, एक प्रमुख कमिशन एजंट विजय कालरा म्हणाले, “सध्या फक्त पिठाच्या गिरण्याचे मालक मंडईतून गहू खरेदी करत आहेत. पुढच्या आठवड्यात गव्हाची आवक सुरू झाली की, अनेक परदेशी लोकही येतील आणि गव्हाची खरेदी सुरू करतील अशी आमची अपेक्षा आहे. हे वाचा - 7th Pay Commission DA Hike : मोदी सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांना दिलं ' मोठं गिफ्ट सुमारे 130 लाख मेट्रिक टन गव्हाची आवक होण्याची तयारी मात्र… दुसरीकडे, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI) च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सरकारनं बाजारात 130 लाख मेट्रिक टन गव्हाची आवक करण्याची तयारी केली आहे. साठवणूक इत्यादीची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या खरेदीच्या हंगामात एफसीआय आणि इतर सरकारी संस्थांना केवळ 122 लाख मेट्रिक टन गहू मिळू शकेल, असा अंदाज आहे. कारण शेतकरी कदाचित त्यांचा संपूर्ण गहू मंडईत आणणार नाहीत.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Russia Ukraine

    पुढील बातम्या