Home /News /videsh /

US Election 2020: आधी सत्ता गेली आता पत्नीही! ट्रम्प यांना घटस्फोट देण्याच्या तयारीत आहे मेलेनिया?

US Election 2020: आधी सत्ता गेली आता पत्नीही! ट्रम्प यांना घटस्फोट देण्याच्या तयारीत आहे मेलेनिया?

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump ) यांना पायउतार व्हावं लागणार हे स्पष्ट झालं. यातच आता ट्रम्प यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.

    वॉशिंग्टन, 08 नोव्हेंबर : अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष (US Election) म्हणून जो बायडन (Joe Biden) यांना निर्णायक आघाडी मिळाली आणि निकाल जाहीर झाला. त्यामुळे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump ) यांना पायउतार व्हावं लागणार हे स्पष्ट झालं. मात्र ट्रम्प यांनी आपला पराभव मान्य केल्याचं दिसत नाही आहे. यातच आता ट्रम्प यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी आणि अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प (Melania Trump ) डोनाल्ड यांना घटस्फोट देण्याच्या तयारीत आहे. स्टेफनी वोल्कॉफनच्या हवाल्यानं डेली मेलनं हे वृत्त दिलं आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प यांचा घटस्फोट होणार आहे. हा घटस्फोट डोनाल्ड नाही तर मेलेनिया देणार आहे. असे सांगितले जात आहे की, दोघांच्या नात्यात दुरावा आला आहे. व्हाइट हाउसमध्ये गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहत आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आली नाही आहे. मात्र सुत्रांनी अशी शक्यता वर्तवली आहे की व्हाइट हाउस सोडताच दोघांमध्ये घटस्फोट होऊ शकतो. वाचा-इथं जो बायडन झाले राष्ट्राध्यक्ष, तिकडे ट्रम्प पाहा काय करत होते; VIDEO VIRAL दुसरीकडे, शनिवारी संपूर्ण देश बायडन यांना शुभेच्छा देत असताना ट्रम्प मात्र गोल्फ खेळण्यात व्यस्त होते. त्यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. ट्रम्प गोल्फ खेळण्यासाठी गेले असतानाही त्यांच्यासोबत मेलेनिया दिसल्या नाहीत. कोण आहेत मेलेनिया ट्रम्प? मॉडेल ते फर्स्ट लेडी असा मेलेनिया यांचा प्रवास फारच रंजक आहे. मेलेनिया लहान देशातून आल्या असल्या तरी त्यांची मॉडेल म्हणून कामगिरी वाखण्याजोगी होती. मेलेनिया या डोनाल्ड ट्रम्प यांच्या तिसऱ्या पत्नी आहेत. मेलानिया यांचा जन्म 1970 मध्ये स्लोव्हेनिया येथे झाला. मेलेनिया या एक स्लोव्हेनियन मॉडेल होत्या. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी मॉडेलिंगला सुरुवात केली. वाचा-H-1B व्हिसाबाबत बायडन घेणार महत्त्वपूर्ण निर्णय, भारतीयांचा होणार फायदा अशी झाली होती ट्रम्प आणि मेलेनिया यांची भेट डोनाल्ड ट्रम्प यांची लव्ह स्टोरी 1998मध्ये सुरू झाली होती. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प 52 वर्षाचे होते तर मेलेनिया 28 वर्षांच्या होत्या. त्यावेळी ट्रप्प राजकारणात नसून रिअल-इस्टेटमध्ये सक्रिय होते. 1998 मध्ये न्यूयॉर्कमधील फॅशन वीक पार्टी दरम्यान मेलेनिया आणि ट्रम्प यांची भेट झाली. त्यावेळी ट्रम्प राजकारणात नव्हते. मात्र रिअल इस्टेटमध्ये त्यांचे मोठे नाव होते. डोनाल्ड ट्रम्प जेव्हा मेलेनियाला भेटले, त्यावेळी त्यांचे लग्न झाले होते आणि दुसरी पत्नी मार्ला मॅपलपासून घटस्फोट होणार होता. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प 52 वर्षांचे होते आणि मेलेनिया 28 वर्षांचे होते. मेलेनिया आणि ट्रम्प हे 3 वर्ष रिलेशनशीपमध्ये होते. त्यानंतर 2004मध्ये साखरपूडा आणि 2005 मध्ये त्यांचे लग्न झाले. रिपोर्ट्सनुसार ट्रम्प यांनी मेलानियाला 1.5 दशलक्ष डॉलर्स हिराच्या अंगठी दिली होती. मेलानिया आणि ट्रम्प यांच्या लग्नात बिल गेट्स आणि हिलरी क्लिंटन यांनी हजेरी लावली होती. 2006मध्ये, मेलेनिया अमेरिकेची नागरिक झाली आणि तिने एका मुलाला जन्म दिला.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Donald Trump, US elections

    पुढील बातम्या