नवी दिल्ली, 9 जानेवारी : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी बुधवारी कॅपिटल भवनवर हल्ला केला. या घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर, अशाप्रकारची हिंसा पुन्हा होऊ नये यासाठी सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म ट्विटरने मोठं पाऊल उचललं आहे. ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट कायमचं बंद केलं आहे.
बुधवारी झालेल्या हिंसेनंतर ट्विटरने ट्रम्प यांचं अकाउंट 12 तासांसाठी ब्लॉक केलं होतं. त्याशिवाय त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन अनेक ट्विट्सही हटवण्यात आले होते. परंतु आता ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट पूर्णपणे सस्पेंड केलं आहे. अशाप्रकारची हिंसा पुन्हा होऊ नये, यासाठी त्यांचं अकाउंट सस्पेंड केल्याचं कारण ट्विटरने दिलं आहे.
हिंसाचाराला उद्युक्त करण्याच्या जोखमीमुळे आम्ही त्याचं अकाउंट कायमस्वरूपी सस्पेंड केलं आहे. ट्विटर नियमांचं उल्लंघन केल्यानं हे पाऊल उचलल्याचं, ट्विटरने स्पष्ट केलं आहे.
After close review of recent tweets from Trump's account and the context around them — specifically how they are being received and interpreted on and off Twitter — we have permanently suspended the account due to the risk of further incitement of violence: Twitter https://t.co/eg5ovKvkxb pic.twitter.com/bLK94TlWYI
— ANI (@ANI) January 8, 2021
ट्विटरसह डोनाल्ड ट्रम्प यांचं फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंटही बंद करण्यात आलं आहे. फेसबुकचे संस्थापक मार्क जुकरबर्ग यांनी सांगितलं की, नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन यांच्या शपथविधीपर्यंत, डोनाल्ड ट्रम्प फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा वापर करू शकणार नाहीत. जो बायडन यांचा राष्ट्रपती पदाचा शपथविधी 20 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Donald Trump, Twitter