कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी

अमेरिकेत 1 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर आतापर्यंत 40 लोकांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 14 मार्च : जगभरात कोरोनाने कहर केला आहे. या व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे अमेरिकेसह जगभरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी रात्री उशिरा अमेरिकेमध्ये आणीबाणी घोषित केली आहे. कोरोना व्हायरसचं संक्रमण आणि वाढता संसर्ग टाळण्यासाठी त्यांनी मोठे निर्णय घेतले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. या व्हायरससोबत लढण्यासाठी ट्रम्प यांनी 5 हजार कोटींची तरतूद केली आहे. या आधी कोरोनाचा सामना करण्यासाठी स्पेनमध्येही राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली होती.

अमेरिकेत 1 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर आतापर्यंत 40 लोकांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर या संसर्गाला रोखण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले असून त्या संदर्भात व्हाइट हाऊसमध्ये घोषणा करण्यात आली. 15 कोटी लोकांना या व्हायरसची लागण होऊ शकते अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याचं आव्हान सर्व देशांसमोर असल्याचं ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

हे वाचा-कोरोनामुळे इटलीत मृत्यूचं थैमान, अवघ्या 24 तासांत 1266 लोकांनी गमावला जीव

पुढचे 8 आठवडे सर्वात महत्त्वाचे आहेत असंही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले आहेत. जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जवळपास 1,34,300 हून जास्त आहे. भारतातही आतापर्यंत कोरोनामुळे 2 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 70 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

अमेरिकेत कोरोना व्हायरच्या टेस्ट फ्री करून दिल्या जाणार आहेत तर पेड सिक लिव्ह दिल्या जाणार असल्याची घोषणाही डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.

दरम्यान, कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असल्याने जगभर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना आता 100 देशांमध्ये पसरला असून हजारो लोक त्याने ग्रस्त झाले आहेत. तर जगभरात मृत्यू पावलेल्यांची संख्याही वाढत आहेत.

हे वाचा-गर्दीने खचाखच भरलेल्या मैदानांवर अशी वेळ कधीच आली नव्हती, पाहा PHOTO

First published: March 14, 2020, 7:00 AM IST

ताज्या बातम्या