'चीन नव्हे अमेरिकेत आहे कोरोनाचा पेशंट झीरो', चीनच्या दाव्यात किती तथ्य?

'चीन नव्हे अमेरिकेत आहे कोरोनाचा पेशंट झीरो', चीनच्या दाव्यात किती तथ्य?

कोरोनाव्हायरसवरून (Coronavirus) अमेरिका-चीनमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

  • Share this:

वॉशिंग्टन, 30 एप्रिल : चीनच्या वुहानमध्ये डिसेंबर 2019 मध्ये कोरोनाव्हायरसचा उद्रेक झाला. त्यानंतर जगभर पसरलेल्या या व्हायरसने आतापर्यंत 30 लाखांपेक्षा जास्त लोकांना विळखा घातला आहे, तर 2 लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाव्हायरसवर उपचारांचा शोध सुरू असताना हा व्हायरस नेमका आला कुठून यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. चीनमधील लॅबमधून कोरोनाव्हायरसचा प्रसार झाला असा आरोप अमेरिकेनं केला, तर आता चीनने अमेरिकन नागरिकालाच यासाठी जबाबदार धरलं आहे.

अमेरिकेतल्या एका सैनिक महिलेला चीननं कोरोनाव्हायरसचा पेशंट जीरो म्हटलं आहे. त्यानंतर या महिलेला जगभरातून धमक्या येत आहेत. खरंतर ही महिला पूर्णपणे निरोगी आहे.

अशी मिळालेलं अफवांना खतपाणी

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये वुहानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मिलट्री वर्ल्ड गेमदरम्यान अमेरिकन लष्करामार्फत माट्जे बेनस्सी (Maatje Benassi) सहभागी झाल्या होत्या. व्हर्जिनियात अमेरिकन लष्कराच्या Fort Belvoir मध्ये काम करणाऱ्या माट्जे तिथं सुरक्षा अधिकारी म्हणून काम करतात. तर त्यांचे पती रिटायर्ड एअरफोर्स अधिकारी आहेत.

हे वाचा - बापरे! मास्क लावला नाही, तर 8 लाख रुपयांचा दंड; कोणत्या देशाने घेतला हा निर्णय?

स्पर्धेदरम्यान माट्जे जखमी झाल्या. त्यानंतर माट्जे या कोरोना शस्त्र असल्याची अफवा अमेरिकेतील यूट्युबर George Webb पसरवली. जॉर्जने याआधाही अशा अनेक अफवा पसरवल्यात आणि गोंधळ माजवला आहे. त्यानेच माट्जे या कोरोना रुग्ण असून त्यांच्यामुळे चीनमध्ये कोरोना पसरला अशी अफवा पसरवली. या अफवेवर चायनीज कम्युनिस्ट पार्टीनेही विश्वास ठेवला आणि या अमेरिकन नागरिकाला दोषी मानू लागली.

चीनी मीडियांनी दावा केला की, व्हायरस हा यूएसने पसरवलेलं जैविक शस्त्र आहे. इतकंच नव्हे तर चीनी सरकारचे अधिकारी झाओ लिझिआन यांनी सार्वजनिकरित्या असा दावा केला. या अधिकाऱ्याने एका व्हिडिओचा हवाला देत सांगितलं की, खुद्द अमेरिकी सीडीसीचे संचालक रॉबर्ट रेडफिल्ड यांनी कोविड-19 मुळे झालेल्या मृत्यूची माहिती दिली होती.

हे वाचा - कोरोना व्हायरस आला कुठून? चीनच्या वुहान लॅबच्या खुलाश्याने गुढ वाढलं

त्यानंतर चीनने अमेरिकेतच कोरोनाव्हायरसचा पेशंट झीरो आहे, ज्याने चीन आणि इतर देशांमध्ये आजार पसरवला, या दाव्याला खतपाणी घातलं. चीनी सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, रॉबर्ट रेडफिल्ड यांच्या मते, अमेरिकेत फ्लूच्या काही रुग्णांना ओळखण्यात चूक झाली असण्याची शक्यता आहे आणि ते कोरोनाव्हायरसने ग्रस्त होते.  चीनचे परराष्ट्र अधिकारी आणि चीनी वृत्तपत्रांनी आपल्या दाव्यांची पुष्टी केली नाही.

माट्जे आणि त्यांच्या पतीमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत

ऑक्टोबरपासून आतापर्यंत माट्जे आणि त्यांच्या पतीमध्ये कोरोनाची कोणतीच लक्षणं नाही, ना अशी कोणती टेस्ट झाली, ज्यामुळे ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं. ते पूर्णपणे निरोगी आहेत आणि त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्यात.

सीएनएनशी बातचीत करताना माट्जे यांनी सांगितलं की "आता काहीही सिद्ध झालं तरी आमच्या प्रतीमेला धक्का पोहोचलाच आहे. आता तर लोकं माझं नाव गुगलवर शोधतील तेव्हा मी कोरोना प्रकरणात पेशंट झीरोच दिसणार. हे एक भयानक स्वप्नासारखं आहे"

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: April 30, 2020, 2:16 PM IST

ताज्या बातम्या