Coronavirus 'चीनी' व्हायरस आहे? चीननं दिलं असं उत्तर

Coronavirus 'चीनी' व्हायरस आहे? चीननं दिलं असं उत्तर

कोरोनाव्हायरसवरून (Coronavirus) चीनवर (China) अनेक आरोप करण्यात आलेत, चीनचं सरकारी वृत्तपत्र पीपल्स डेलीने (People's Daily) या प्रत्येक आरोपांना उत्तर दिलं आहे.

  • Share this:

बीजिंग, 30 एप्रिल : जगभरात कोरोनाव्हायरस (Coronavirus) रुग्णांची संख्या 32 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. कोरोनाव्हायरस पसरण्यासाठी चीनला (China) जबाबदार धरलं जातं आहे. चीनवर अनेक आरोप केले जात आहेत. अमेरिकेसारख्या इतर पाश्चिमात्य देशांनी चीनला टार्गेट केलं आहे आणि अशाच आरोपांना चीनचं सरकारी वृत्तपत्र पिपल्स डेलीने (People's Daily) उत्तर दिलं आहे.

कोरोनाव्हायरस चीनच्या लॅबमध्ये बनवण्यात आला

कोविड-19 हा नैसर्गिक नसून चीनच्या लॅबमध्ये तयार करण्यात आला, असं म्हटलं जातं आहे. पिपल्स डेलीमध्ये सांगण्यात आलं की, हा व्हायरस नैसर्गिक आहे, हे अनेक वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झालं आहे. फेब्रुवारीमध्ये जर्मनीतील व्हायरोलॉजिस्ट ख्रिश्चन ड्रॉस्टेनसह इतर 26 शास्त्रज्ञांनी लॅन्सेट जर्नलमध्ये या व्हायरसला नैसर्गिक सांगितलं आहे. खुद्द जागतिक आरोग्य संघटनेनंही याची पुष्टी केली आहे.

हे वाचा - 700 वर्षांपूर्वीही लोकांना समजलं Social distancing चं महत्त्व, महिनाभर केलं जात होतं क्वारंटाइन

हा व्हायरस नेमका कुठून आला याबाबत अद्याप ठोस माहिती शास्त्रज्ञांना नाही मात्र वटवाघूळ किंवा पँगोलिनसारख्या प्राण्यातून हा आला असावा.

कोविड-19 चीनी व्हायरस आहे कारण याची सुरुवात वुहानमध्ये झाली

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, या व्हायरसचं नाव SARS-CoV-2 आहे. वुहानमध्ये या व्हायरसचं पहिलं प्रकरण समोर आलं, याचा अर्थ असा नाही ही हे शहर या व्हायरसचा स्रोत आहे. जसंत एचआयव्ही एड्सचा पहिला रुग्ण अमेरिकेत आढळला होता मात्र या व्हायरसची सुरुवात कित्येक दशक आधी पश्चिम आफ्रिकेत झाली होती.

चीनला नोव्हेंबर 2019 मध्ये व्हायरसबाबत माहिती झाली होती, मात्र ती लपवली

पीपल्स डेलीनं सांगितलं, वुहानच्या स्थानिक प्रशासनाने या व्हायरसचं पहिलं प्रकरण 27 डिसेंबरला नोंदवलं. चीनच्या  शास्त्रज्ञांनी या व्हायरससंबंधी अभ्यास सुरू केला आणि 24 जानेवारीला म्हणजे 27 दिवसांत लॅन्सेट जर्नलमध्ये याबाबत पहिलं संशोधन प्रकाशित केलं,

ज्या डॉक्टरने कोरोनाव्हायरसबाबत सावध केलं होती, त्याला अटक केली

पिपल्स डेलीमध्ये म्हटल्यानुसार प्रत्यक्षात ज्या डॉक्टरने या आजाराबाबत सावध केलं होतं, त्यांना पुरस्कृत करण्यात आलं होतं. कोणत्याही डॉक्टराला या आजाराबाबत सावध केलं म्हणून अटक करण्यात आली नाही. ली वेलियांग हे कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य होते. त्यांनी वीचॅटवर बातचीत करताना आपल्या काही ओळखीच्या व्यक्तींना वुहानच्या सीफूड मार्केटमध्ये 7 कोरोना रुग्ण सापडल्याचं सांगितलं होतं आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याचा सल्ला दिला होता.

हे वाचा - भविष्यातील महासाथीपासून जगाला वाचवणारे 'व्हायरस हंटर्स'

वेलियांग यांच्या या मेसेजमुळ बहुतेक लोकं आजाराबाबत जागरक झालं. जेव्हा स्थानिक पोलिसांना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी वेलियांग यांना पोलीस ठाण्यात बोलावलं आणि त्याबाबत चौकशी करून पुन्हा घरी पाठवलं. त्यानंतर 31 जानेवारीला त्यांनाही कोरोनाची लागण झाली आणि 7 फेब्रुवारीला त्यांचा मृत्यू झाला.

जागतिक आरोग्य संघटनेला आपल्या बाजूनं केलं

चीनवर कोरोनाव्हायरस पसरवण्याचे आरोप आहेत, त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेलाही चीनने आपल्या बाजून केलं असं म्हटलं जातं. पिपल्स डेलीमध्ये म्हणण्यात आलं आहे की, जागतिक आरोग्य संघटना ही एक जागतिक आणि स्वतंत्र संस्था आहे, तिला आपल्या बाजूनं कसं करता येईल? जागतिक आरोग्य संघटनेच्या लीडरशिपमध्ये फक्त रेन मिनघुई हे एकच चीनी सदस्य आहे. तर 11 सदस्य अमेरिका, युरोप आणि कॅनडातील आहेत. फंडिंग थांबवण्यापूर्वी तर अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेला सर्वात जास्त फंड देत होतं. फंडिग देण्याबाबत चीन सहावा आहे. अशा स्थितीत सामान्यत: अमेरिकेचा दबदबा जास्त आहे. मग चीन WHO ला आपल्या बाजूनं कसं करू शकतो?

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: April 30, 2020, 12:43 PM IST

ताज्या बातम्या