चीनने पसरवला का कोरोना? अमेरिकेच्या दाव्यावर वुहानच्या लॅबनं दिलं उत्तर

चीनने पसरवला का कोरोना? अमेरिकेच्या दाव्यावर वुहानच्या लॅबनं दिलं उत्तर

वुहानच्या लॅबमधून चीनमध्ये आणि त्यानंतर जगभर कोरोना पसरला असल्याचा आरोप अमेरिकेसह अनेक देशांनी केला आहे.

  • Share this:

बिजिंग, 19 एप्रिल : जगभर हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जवळपास 1 लाख 60 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. चीनमधून याचा प्रादुर्भाव जगभर झाला. यामुळे अमेरिकेनं चीननेच कोरोना तयार केल्याचा दावाही केला आहे. दरम्यान, वुहानमधील लॅबने हे सर्व आरोप पहिल्यांदाच फेटाळून लावले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या आरोपांनासुद्धा फेटाळलं आहे. ट्रम्प यांनी आरोप केला होता की, हा धोकादायक व्हायरस जगभर पसरण्यास चीनच्या लॅबमधूनच सुरूवात झाली होती. अमेरिकेसह अनेक देशांनी चीनवर कोरोनाबाबत आरोप केले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं की,'कोरोना व्हायरस वुहानमधील एका लॅबमधून निघाला आणि जगभर पसरला.' गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात वुहानमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर असं म्हटलं जात होतं की, हा व्हायरस वुहानमधील WIV किंवा हुआननानच्या सीफूड मार्केटमधून पसरला आहे. WIV आणि त्यांची खास अशी पी4 लॅब अशा धोकादायक व्हायरसना जतन करण्यास सक्षम आहे. दरम्यान, याबाबत फेब्रुवारीत लॅबने कोरोनाबाबतच्या अफवा फेटाळून लावल्या होत्या.

वुहानच्या लॅबचे संचालक युआन झिमिंग यांनी म्हटलं होतं की, त्यांची लॅब कोरोनाचा स्रोत नाही. सर्व अफवा आहेत. आम्हाला माहिती आहे या लॅबमध्ये कोणत्या प्रकारचं संशोधन होतं आणि इथं व्हायरस, नमुने कसे जतन केले जातात. व्हायरस लॅबमधून आला का हा प्रश्नच उरत नाही असंही ते म्हणाले होते.

हे वाचा : वुहानच्या लॅबमधील इंटर्नमुळे जगभर पसरला कोरोना, रिपोर्टमध्ये खळबळजनक दावा

लॅबचे संचालक म्हणाले की,'इथं कडक व्यवस्था आहे. संशोधनासाठी आचारसंहिता असल्यानं आम्हाला विश्वास आहे. लोकांना ज्यावेळी काहीच मिळत नाही तेव्हा असा काहीतरी संबंध लावण्याचा प्रयत्न करतात.' अमेरिकेनं केलेल्या आरोपांना उत्तर देताना ते म्हणाले की, हे दुर्दैवी आहे की काही लोक कोणत्याही तथ्याशिवाय आणि माहितीशिवाय विनाकारण दिशाभूल करत आहेत. कोरोना व्हायरस मानवनिर्मित असू शकत नाही. असा कोणाताही पुरावा नाही की हा कृत्रिम आहे.

हे वाचा : COVID-19: सर्वात मोठी बातमी! ऑक्टोबरपर्यंत लस उपलब्ध होण्याची शक्यता

कोरोना व्हायरसमुळे जगातील काही देशात मृत्यूनं थैमान घातलं आहे. इटली, स्पेन, इराण, अमेरिका या देशांमध्ये कोरोनाने हाहाकार उडाला आहे. याशिवाय अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. आतापर्यंत जगातील 23 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दीड लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हे वाचा : दोन बायका असलेल्या पतीची लॉकडाऊनमध्ये अवस्था, प्रशासनाला फोनवर सांगितली कहाणी

First published: April 19, 2020, 6:53 PM IST

ताज्या बातम्या