दोन बायका असलेल्या पतीची लॉकडाऊनमध्ये झाली अवस्था, प्रशासनाला फोन करून सांगितली कहाणी

दोन बायका असलेल्या पतीची लॉकडाऊनमध्ये झाली अवस्था, प्रशासनाला फोन करून सांगितली कहाणी

सरकार आपले चांगले काम करत आहे. पण अशात दुबईत एक प्रकरण समोर आले आहे ज्याने जगातील सर्व लोक चकित झाले आहेत.

  • Share this:

दुबई, 19 एप्रिल : संपूर्ण जग कोरोनाव्हायरसमुळे असुरक्षित आहे. लोक आजारी पडत आहेत, एकामागून एक लोक मृत्यूमुखी पडत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. भारत (India), अमेरिका (America) पासून जगातील सर्व देश फक्त याच विचारात आहेत की या आजाराला कसं संपवायचं. लॉकडाऊन हा या प्रक्रियेचा एक भाग आहे आणि नागरिक सुरक्षित राहू शकतील यासाठी हे लॉकडाउन दुबईमध्येही ठेवले आहे. दुबईसारख्या व्यस्त ठिकाणीसुद्धा आजारपणाच्या भीतीने लोक आपल्या घरात राहायला भाग पाडतात.

सरकार आपले चांगले काम करत आहे. पण अशात दुबईत एक प्रकरण समोर आले आहे ज्याने जगातील सर्व लोक चकित झाले आहेत. दुबईमध्ये एका व्यक्तीने सरकारला लॉकडाऊनमध्ये बाहेर पडण्यास परमिट मागितले आहे आणि हे सगळं त्याने आपल्या 2 बायकांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी केलं आहे.

बातमी गल्फ न्यूजची आहे. असे सांगितले जात आहे की, दुबई पोलिसांचा एक अधिकारी स्थानिक रेडिओवरून कॉलद्वारे लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देत होता. यादरम्यान, त्याच्यासमोर एक प्रश्न आला. प्रश्नातील व्यक्तीने अधिकाऱ्याला फोनद्वारे विचारले की, 'मी दोन स्त्रियांशी लग्न केले आहे. मला दोन्ही महिलांना घरी जाण्यासाठी परवानगी मिळेल का?' व्यक्तीचा असा प्रश्न ऐकूण अधिकाऱ्याला धक्काच बसला. पण मोठ्या हुशारीने त्याने हसू आवरलं.

लेकरासाठी आई कोरोनाशी लढली, 22 दिवसांच्या मरणयातनेनंतर दिला गोड बाळाला जन्म

या प्रकरणातील सर्वात मनोरंजक गोष्ट अशी आहे की, परिवहन विभागाचे संचालक ब्रिगेडियर सैफ मुहीर अल मजरोई यांच्याकडे असा प्रश्न प्रथमच घडलेला नाही. अल मजरोइच्या म्हणण्यानुसार, 'मला असे बरेच प्रश्न आले आहेत. त्यांनी हे देखील सांगितले की परमिट फक्त एकदाच आहे आणि लोकांना जेव्हा आवश्यक कामांसाठी घराबाहेर जावे लागते तेव्हा परमिटसाठी अर्ज करावा लागतो.

स्थानिक पोलिस आणि प्रशासनाच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी दिलेली ही परवानगी म्हणजे लोकं घराबाहेर पडतील. त्यामुळे इतर लोक पण परवाणगी मागतिल आणि या आजाराचा फैलाव आणखी वाढेल. गल्फ न्यूजने अल मझरोवीचा हवाला देत असेही म्हटले आहे की, 'एखाद्याला जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी साप्ताहिक परवानग्या देणे तर्कसंगत नाही, कारण आमचे ध्येय रस्त्यांवरील रहदारी कमी करणे आहे.

दिल्ली हादरली! एकाच कुटुंबातील तब्बल 31 जणांना कोरोनाची लागण, परिसरात खळबळ

दुबई पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवर हे स्पष्ट केले आहे की, आवश्यक उद्दीष्टे वगळता ते महत्त्वाच्या क्षेत्रात कार्य करत असतील तरच ते निघू शकतात. त्याचबरोबर या व्यतिरिक्त कोणावरही कठोर कारवाई केली जाईल असेही पोलिसांनी सांगितले आहे. तथापि, परिस्थिती सामान्य होईपर्यंत लॉकडाउन उघडण्यापर्यंत दोन बायका असलेल्या या नवऱ्याने आपल्या पत्नीबरोबरच राहावे लागेल.

भरधाव ट्रकची पोलिसांच्या चौकीला भीषण धडक, अधिकाऱ्यांनी वेळीच मारल्या उड्या

संकलन आणि संपादन - रेणुका धायबर

First published: April 19, 2020, 9:09 AM IST

ताज्या बातम्या