कोरोनाच्या लढ्यातील सर्वात मोठी बातमी, ऑक्टोबरपर्यंत COVID-19वर लस उपलब्ध होण्याची शक्यता

ऑक्टोबर महिन्यापर्यंत कोव्हिड-19 (COVID-19)साठी आवश्यक वॅक्सिन तयार करण्यात ऑक्सफर्ड विद्यापीठामधील शास्त्रज्ञांना यश येण्याची शक्यता आहे

ऑक्टोबर महिन्यापर्यंत कोव्हिड-19 (COVID-19)साठी आवश्यक वॅक्सिन तयार करण्यात ऑक्सफर्ड विद्यापीठामधील शास्त्रज्ञांना यश येण्याची शक्यता आहे

  • Share this:
    17 एप्रिल : ऑक्टोबर महिन्यापर्यंत कोव्हिड-19 (COVID-19)साठी वॅक्सिन तयार करण्यात ऑक्सफर्ड विद्यापीठामधील शास्त्रज्ञांना यश येण्याची शक्यता आहे.यामध्ये मेपर्यंत कोव्हिड-19 लसीची चाचणी 500 जणांवर करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठातील वॅसिनोलॉजीच्या (vaccinology) प्राध्यापिका सारा गिलबर्ट यांनी द लॅनसेट (The Lancet) ला दिली आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार 18 ते 55 वयोगटातील व्यक्तींवर ही चाचणी करण्यात येणार आहे. या वयोगटातील व्यक्तींची early stage randomized controlled trial आणि mid stage randomized controlled trial साठी नोंदणी करण्यात येत आहे. (हे वाचा-कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी रुग्णालयात काम करतेय ही राजकुमारी, PHOTO व्हायरल) गिलबर्ट यांनी द लॅनसेटला अशी माहिती दिली आहे की, ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत फेज-3 मध्ये आमच्याकडे परिणामकारक निकाल असेल आणि आम्ही मोठ्या संख्येने वॅक्सिनची निर्मिती करता येईल. मात्र ही गोष्ट अत्यंत महत्वाकांक्षी आहे आणि यामध्ये बदल सुद्धा होऊ शकतात,असही त्या पुढे म्हणाल्या. 1994 पासून त्या ऑक्सफर्डमध्ये वॅक्सिन्सचा अभ्यास करत आहेत. कोरोना व्हायरस वॅक्सिन संशोधनासाठी त्यांना आणि त्यांच्या टीमला यूकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ रिसर्च आणि यूके रिसर्च अँड इनोव्हेशन कडून 2.8 मिलियन डॉलरचे अनुदान देण्यात आले आहे. (हे वाचा-कोरोना व्हायरसचे जगभरातील 24 तासांतले अपडेट वाचा एका क्लिकवर) ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम प्रायोगिक तत्वावर ज्या क्लिनीकल ट्रायल घेण्यात आल्या त्या त्यांच्या टीमकडून घेण्यात आल्या. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार एकूण 70 वॅक्सिनवर अभ्यास सुरू आहे तर याव्यतिरिक्त 3 वॅक्सिनच्या मानवी चाचण्या सुरू आहेत. या वॅक्सिन्सचा अभ्यास CanSino Biological Inc, Beijing Institute of Biotechnology,  Inovio Pharmaceuticals Inc., Moderna Inc.  त्याचप्रमाणे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अलर्जी आणि इन्फेक्शस डिजीजेस याठिकाणी सुरू आहे. (हे वाचा-धक्कादायक! डॉक्टरांनी केलं मृत घोषित, दफन करण्याआधीच उठून बसली महिला) गिलबर्ट यांची चाचणी 510 उमेदवारांची विभागणी 5 गटांमध्ये करते. ज्याचं निरिक्षण सहा महिन्यांसाठी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे चाचणी सुरू केल्यानंतर वर्षभराने सुद्धा त्यांचा फॉलोअप घेण्यात येणार आहे. यानंतर लसीकरणा प्रक्रियेच्या चार आठवड्यानंतर एका गटाला देण्यात येणारा दुसरा डोस intramuscular म्हणजेच स्नायुंमध्ये देण्यात येईल. ChAdOx1 nCoV-19 या वॅक्सिनची कार्यक्षमता, सुरक्षा आणि प्रतिकारक्षमता निश्चित करण्याचे ध्येय या संशोधनातून साध्य करण्यात येणार आहे. संपादन - जान्हवी भाटकर  
    First published: