Home /News /videsh /

वुहानच्या लॅबमधील इंटर्नमुळे जगभर पसरला कोरोना, रिपोर्टमध्ये खळबळजनक दावा

वुहानच्या लॅबमधील इंटर्नमुळे जगभर पसरला कोरोना, रिपोर्टमध्ये खळबळजनक दावा

अमेरिकेत ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या कोरोना लशीची मानवी चाचणी सुरु असून त्याचे निकालही सकारात्मक आले आहेत.

अमेरिकेत ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या कोरोना लशीची मानवी चाचणी सुरु असून त्याचे निकालही सकारात्मक आले आहेत.

जगभरात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत दीड लाख लोकांनाच मृत्यू झाला आहे.

    वॉशिंग्टन, 18 एप्रिल : जगभरात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत दीड लाख लोकांनाच मृत्यू झाला आहे. दरम्यान या व्हायरसचा प्रादुर्भाव चीनमधून जगभर झाल्यानं अनेक देशांनी चीनवर आरोप केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हंटल की अमेरिका कोरोनाच्या स्रोताची चौकशी करत आहे. कोरोनावरून चीनमधील वूहानमध्ये असलेली लॅब सर्वांच्या निशाण्यावर आहे. या लॅबमध्ये वटवाघळावर संशोधन सुरू होते. चीनमध्ये असलेली लॅब अमेरिकेच्या आर्थिक मदतीनंतर गुहांमधून काढलेल्या वटवाघूळावर संशोधन करत होती असेही काही माध्यमांनी म्हंटले होते. वूहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजिमध्ये हे संशोधन केलं जातं होत. अमेरिकेच्या सरकारने यासाठी 10 कोटींचे पॅकेजही दिले होते. याच लॅबवर कोरोना पसरवल्याचा आरोप केला जात आहे. हे वाचा-अल्पवयीन मुलाने चोरीचे कारण सांगताच न्यायधीशांच्या डोळ्यात आलं पाणी आता एक खळबळजनक दावा फॉक्स न्युजने केला आहे. त्यात म्हंटल आहे की, चीनने खास उद्देश समोर ठेऊन कोरोना व्हायरस तयार केला. फॉक्स न्युजने म्हंटल की, सूत्रांच्या माहितीनुसार चीनने कोरोना व्हायरस बायोवेपन म्हणून नव्हे तर जगाला आपली ताकद दाखवण्यासाठी तयार केला होता. चीनला हे दाखवायचं होतं की ते कोरोनासारख्या भयंकर व्हायरसचा शोध अमेरिकेपेक्षा चांगल्या पद्धतीने लावू शकतात. तसंच त्याला आटोक्यात आणू शकतात. आतापर्यंतचे हे सर्वात महागडे गुप्त संशोधन ठरू शकते. सुरुवातीला हा व्हायरस वटवाघळापासून माणसात घुसला. ज्यांच्यामध्ये पहिल्यांदा हा व्हायरस घुसला तो लॅबमध्ये इंटर्न म्हणून काम करत होता. या पेशंट झिरो ला अपघाताने कोरोनाची पहिल्यांदा लागण झाली. त्यांनतर तो पेशंट झिरो जवळच असलेल्या मार्केटमध्ये गेला आणि तिथून कोरोना जगभर पसरला असा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही याबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या आणि ऐकत आहे. सध्या याचा तपास करत आहे. ट्रम्प यांच्या आधी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चीनवर आरोप करत त्यांच्याच लॅबमधून कोरोना पसरल्याचं म्हंटल होतं. जगभरातून आरोप केले जात असताना चीनने मात्र सर्व फेटाळून लावलं. कोरोना व्हायरस लॅबमध्ये तयार झाला नसल्याचे चीनने जागतिक आरोग्य संघटनेच्या हवाल्याने सांगितले. चीनने जरी नाकारलं असलं तरी अमेरिका याचा शोध घेत आहे. हे वाचा-वर्दीतली माणसं! कोरोनाच्या संकटात लोकांसाठी देवदूत ठरतायत पोलीस, पाहा PHOTOS
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या