Home /News /videsh /

Flight मध्ये SEX ची ऑफर देत होती Air Hostess; अंतर्वस्त्राच्या विक्रीपासून अनेक गंभीर गोष्टी उघड

Flight मध्ये SEX ची ऑफर देत होती Air Hostess; अंतर्वस्त्राच्या विक्रीपासून अनेक गंभीर गोष्टी उघड

याबरोबरच अनेक धक्कादायक प्रकार Flight मध्ये घडत असल्याचे उघड झाले आहे

    लंडन, 29 नोव्हेंबर : ब्रिटीश एअरवेज (British Airways)  फ्लाइटच्या उड्डाणादरम्यान एक एअर होस्टेस (Air Hostess) प्रवाशांना सेक्सची ऑफर (Sex Offer) देत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सांगितलं जात आहे की, ही एअर होस्टेस ऑनबोर्ड असताना फेसबुकवर अश्लील फोटो शेअर करते आणि लोकांना ऑफर देते. हा प्रकार समोर आल्यानंतर ब्रिटीश एअरवेजने तपास सुरू केला आहे. ग्राहकांना हायक्लबमध्ये सामील होण्याची ऑफर सांगितले जात आहे की, यासोबतच ब्रिटीश एअरवेजची होस्टेस प्रवाशांना माइल हाय क्लबमध्ये सामील होण्याबाबत सांगत होती आणि पैसे भरल्यास कोणत्याही व्यक्तीला उड्डाणादरम्यान मनोरंजन (Sex) देण्याची ऑफर देत होती. या प्रकार समोर आल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. लॉकडाऊननंतर अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. हे ही वाचा-तुम्ही या महिलेला ओळखता का? त्यांच्यामुळे तयार झालीये कोरोनाची लस... 50 युरोची सिक्युरिटी फीस metro.co.uk च्या रिपोर्टनुसार फ्लाइटमध्ये काढलेले अश्लील फोटो AirHostess71 अकाउंटवरुन पोस्ट करत फ्लाइट अटेंडेंट ही प्रवाशांना यासाठी तब्बल 50 यूरो (साधारण 4400 रुपये) इतकी सिक्युरिटी रक्कम देण्याचं आवाहन करीत होती. डिमांडनुसार हे बदलत राहिल असंही तिने पुढे म्हटलं. फेसबुकवर पोस्ट केलेल्या फोटोला कॅप्शन दिलं होतं, 'प्रिय प्रवासी, मी हवाई उड्डाणादरम्यान मनोरंजनासाठी तुमची आहे. तुमची काय इच्छा आहे?' 25 युरोमध्ये विकते अंतर्वस्त्र एक फ्लाइट अटेंडेंटने द सनला दिलेल्या मुलाखतीनुसार फ्लाइटदरम्यान हवं ते मनोरंजन मिळवून देण्याचा प्रकार सुरू झाला आहे. येथे अनेक Air Hostess हवं ते करण्याची तयारी दाखवितात. याशिवाय तिने सांगितले की ती आपले अंतर्वस्त्र (underwear) 25 युरोमध्ये विकून अतिरिक्त कमाई करते. याशिवाय जेव्हा ती कामापासून दूर राहते तेव्हा ती दुसऱ्या देशातील लोकांना (अनेकदा प्रवासी) भेटते आणि त्यांच्याशी जवळीक करते. मात्र यासाठी सुरक्षा व गोपनीयता पाळून हॉटेल बुक करावे लागते असेही तिने सांगितले. ब्रिटीश एअरवेजने तपास केला सुरू एका अन्य फ्लाइट अटेंडेंटने सांगितलं की, कोरोना व्हायरसमुळे अनेकांना पगार कपातीचा सामना करावा लागला. त्यामुळे अनेकजण अशा प्रकारचे काम करीत आहेत. या संपूर्ण प्रकरणावर ब्रिटीश एअरवेजच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, आम्ही नेहमी आमच्या सहकाऱ्यांकडून चांगल्या वागणुकीची अपेक्षा करतो. या प्रकरणात गंभीर तपास सुरू आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Lockdown, Sexual offences, Travel by flight

    पुढील बातम्या