Home /News /coronavirus-latest-news /

तुम्ही या महिलेला ओळखता का? त्यांच्यामुळे तयार झालीये कोरोनाची लस...

तुम्ही या महिलेला ओळखता का? त्यांच्यामुळे तयार झालीये कोरोनाची लस...

या महिनेले ब्रिटन आणि जगाला कोविड -19 लस मिळवून देण्याची आशा दाखवली आहे.

    इंग्लंड, 29 नोव्हेंबर : ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्राजेनेका लशीच्या (Oxford-Astrazeneca Vaccine) चाचणीनंतर खूप सकारात्मक निकाल समोर आले आहेत. कोरोना व्हायरस विरूद्ध लशीच्या कार्यक्रमाला मिळालेलं यश या महिला वैज्ञानिकेच्या नेतृत्वामुळे शक्य झाल्याचं सांगितलं जात आहे. या महिलेचं नाव आहे सारा गिलबर्ट(Sarah Gilbert) . या महिनेले ब्रिटन आणि जगाला कोविड -19 लस मिळवून देण्याची आशा दाखवली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बीबीसीने 2020 च्या 100 प्रभावशाली महिलांची यादी प्रसिद्ध केली होती आणि त्यात सारा यांचादेखील समावेश केला आहे. लस संशोधनाबाबत सारा गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. आता चाचण्यांच्या ट्रायलनंतर वॅक्सिन 90 टक्क्यांपर्यंत परिणामकारक असल्याचे वृत्त समोर आले आहे. यामध्ये साराचं मोठं योगदान आहे. साराची कहाणी आणि तिच्या आयुष्याविषयी जाणून घ्या. ..तर लस मिळाली नसती जेव्हा सारा एंगिला विद्यापीठात जीवशास्त्र विज्ञानाचा अभ्यास करीत होती, तेव्हा तिला अनेक क्षेत्रांत अनुभव घेण्याची आणि प्रयोग करण्याची इच्छा होती, परंतु जेव्हा तिने हल विद्यापीठातून डॉक्टरेट केली त्यानंतर तिने बर्‍याच वेळ एका विषयावर लक्ष केंद्रित केले. खरं तर ते करावं लागलं. ही बाब त्याच्या मनाविरुद्ध होती. त्यावेळी साराने विज्ञानाच्या क्षेत्राला निरोप देण्याची तयारी केली होती. यावर्षी बीबीसी रेडिओ 4 च्या कार्यक्रमात सारा म्हणाली होती की, विज्ञान या विषयापासून वेगळं होण्याचं ठरविल्यानंतर तिने पुन्हा विचार केला आणि त्या वेळी तिला काही पैशांची गरज असल्याने तिने स्वत: ला संधी द्यावी असे ठरवलं. साराने हा निर्णय घेतला नसता तर आज ती लशीचा विकास करु शकली नसती, जे चाचण्यानंतर 70 ते 90 टक्के प्रभावी असल्याचे मानले जात आहे. हे ही वाचा-मग कोरोना लशीचे बारामतीच्या लॅबमधून वितरण करणार का? चंद्रकांत पाटलांचा टोला यापूर्वीही साराचा लशीच्या विकासात होता सहभाग कोरोना लस तयार करण्यापूर्वी सारा गिलबर्टचे नाव मलेरिया लसीशी जोडले होते. 1962 मध्ये यूकेमध्ये जन्मलेल्या साराला निश्चयी आणि करारी व्यक्तिमत्व असलेली महिला म्हटले जाते. चिंताग्रस्त असूनही साराने डॉक्टरेटची पदवी संपादन केली होती आणि त्यानंतर वाइन उद्योगाशी संबंधित एका संशोधन केंद्रात काम केले. येथून त्या  यीस्ट आणि त्याचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम याबाबतही माहिती घेतली. व्यवसाय आणि कुटुंब नोकरदार महिला आणि घरसांभाळणाऱ्या महिलांसमोर सर्वात मोठं आव्हान म्हणजे काम आणि कुटुंब यांच्यात संतुलन. सारा यांचे वडील चपलांच्या व्यवसायासंबंधित काम करीत होचे. तर आई इंग्रजी विषयाची शिक्षिका होती.  विज्ञानाच्या क्षेत्रात कामातून वेळ काढणेही त्यांना आव्हानात्मक होते. त्यांना तीन जुळ्या मुली असल्याने त्यांनाही वेळ देणं गरजेचं होतं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona vaccine, Coronavirus

    पुढील बातम्या