वॉशिंग्टन, 02 ऑगस्ट : डिसेंबर 2019 पासून जगभर थैमान घालणारा कोरोनाव्हायरस (Coronavirus) नेमका आला (Corona origin) तरी कुठून याचा शोध अद्यापही सुरूच आहे. संशयाची सुई चीनकडेच (Coronavirus in china) आहे आणि अमेरिका याचा कसून तपास करत आहे. अशातच आता अमेरिकेच्या हाती चीनविरोधात एक मोठा पुरावा लागला आहे. वुहान लॅबमधूनच कोरोनाव्हायरस लीक (Coronavirus leak from wuhan lab) झाला, असा दावा यूएस रिपब्लिकने (US Republicans) केला आहे. यूएस रिपब्लिकने सोमवारी एक रिपोर्ट जारी केला आहे. कोरोना महासाथीला कारणीभूत ठरणारा कोरोनाव्हायरसचा स्रोत ही चीनची वुहान लॅबच आहे, असा दावा यामध्ये करण्यात आला आहे. सप्टेंबरच्या आधीच वुहान इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजी (WIV) मधून कोरोनाव्हायरल लीक झाला होता, याचा पुरावा आहे. असं या रिपोर्टमध्ये नमूद कऱण्यात आलं आहे. तसंच मीट मार्केटमधून कोरोना आल्याची थिएरी या रिपोर्टमध्ये नाकारण्यात आली आहे. हे वाचा - अरे देवा! अश्रूंमधूनही पसरू शकतो कोरोनाव्हायरस; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. वुहान मीट मार्केट (Wuhan Meat Market) कोरोनाचा स्रोत असू शकतो, ही शक्यता पूर्णपणे नाकारण्याची वेळ आली आहे. 12 सप्टेंबर, 2019 आधीच कोरोनाव्हायरस वुहान लॅबमधून लीक झाला, असे संकेत आम्हाला पुराव्यातून मिळत आहे. लॅबमध्ये सुरक्षा प्रोटोकॉल नीट नव्हतं. जुलै 2019 मध्ये वेस्ट ट्रिटमेंट सिस्टमसाठी 1.5 दशलक्ष डॉलर्सची मागणी करण्यात आली होती. चीनी शास्त्रज्ञ माणसांना संक्रमित करण्यासाठी कोरोनाव्हायरसला बदलण्याचं काम करत होते. अशा हेराफेरीला लपवता येऊ शकत होतं. वुहान लॅबला अमेरिका आणि चीनी सरकार दोघांकडूनही मोठ्या प्रमाणात निधी मिळत होता. अमेरिकेतील संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊसी यांनीसुद्धा वुहान लॅबला हजारो डॉलर्सचा निधी दिल्याचं मान्य केलं आहे. हे वाचा - आता चिंताच मिटली! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेआधी मोदी सरकारने दिली दिलासादायक बातमी जागतिक आरोग्य संघटनेनंही चीनमध्ये जाऊन कोरोनाव्हायरसच्या स्रोताचा शोध घेतला. वुहानमध्ये डिसेंबर 2019 मध्ये जिथं कोरोनाचा पहिलं प्रकरण आलं तिथं आणि वुहान लॅबचा दौरा केला. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेन व्हायरल लॅबमधून आला असल्याची शक्यता फेटाळली आणि नैसर्गिकरित्याच तो प्राण्यांमार्फत माणसांपर्यंत पोहोचला असावा असं सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.