मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

अरे देवा! अश्रूंमधूनही पसरू शकतो कोरोनाव्हायरस; संशोधनातून मिळाली धक्कादायक माहिती

अरे देवा! अश्रूंमधूनही पसरू शकतो कोरोनाव्हायरस; संशोधनातून मिळाली धक्कादायक माहिती

कोरोना रुग्णांच्या डोळ्यातील पाण्यातही कोरोनाव्हायरसचं (Coronavirus in tears) अस्तित्व आढळलं आहे.

कोरोना रुग्णांच्या डोळ्यातील पाण्यातही कोरोनाव्हायरसचं (Coronavirus in tears) अस्तित्व आढळलं आहे.

कोरोना रुग्णांच्या डोळ्यातील पाण्यातही कोरोनाव्हायरसचं (Coronavirus in tears) अस्तित्व आढळलं आहे.

चंदीगड, 02 ऑगस्ट :  शिंकण्याने, खोकण्याने कोरोनाव्हायरस पसरतो हे तर आपणा सर्वांना माहिती आहे. म्हणूनच आपण सर्वजण चेहऱ्यावर मास्क लावून फिरत आहोत. पण आता तर डोळ्यातील अश्रूंमधूनही कोरोनाचा संसर्ग (Coronavirus spread through tears) होऊ शकतं, अशी धक्कादायक माहिती एका संशोधनातून समोर आली आहे.

अमृतसरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानं (Amritsar Government Medical college) केलेल्या या संशोधनानुसार, कोविड-19 ची (Covid-19) लागण झालेल्या रुग्णांच्या अश्रूंद्वारेही कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. डोळ्यांमधून वाहणाऱ्या अश्रूंमध्येही (Coronavirus in tears) सार्स -कोव्ह-2चे(SARS COV-2) अस्तित्व आढळलं आहे. अर्थात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव होण्याचा मुख्य स्रोत हा शिंकणे, खोकणे यातून उडणारे द्रव बिंदूच आहे.

एखाद्या आजारामुळे कधीकधी ‘ऑक्युलर मॅनिफेस्टेशन’(Ocular Manifestation) अर्थात डोळ्यांनाही त्रास होतो. उदाहरणार्थ, ताप, सर्दी झाली असेल तर डोळे जळजळतात, डोळ्यातून पाणी येतं. अशी लक्षणं दिसणाऱ्या रुग्णांच्या डोळ्यांद्वारे वाहणाऱ्या पाण्यातही कोरोना विषाणू असतात. त्यामुळे त्याद्वारेही संसर्ग पसरू शकतो, असा निष्कर्ष या अभ्यासात मांडण्यात आला आहे.

हे वाचा - आता चिंताच मिटली! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेआधी मोदी सरकारने दिली दिलासादायक बातमी

120 कोविड-19 ग्रस्त रूग्णांच्या अभ्यासानंतर हा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. 120 रुग्णांपैकी 60 जणांना ‘ऑक्युलर मॅनिफेस्टेशन’ म्हणजेच डोळ्यांचे विविध त्रास झाले तर 60 जणांना असं काहीही झालं नाही. 41 रुग्णांमध्ये नेत्रपटलाचा हायपरिमिया, 38 रुग्णांमध्ये फॉलिक्युलर रिअॅक्शन्स (Follicular Reactions), 35 जणांमध्ये मध्ये केमोसिस, 20 रुग्णांमध्ये म्यूकोइड डिस्चार्ज आणि 11 रुग्णांमध्ये डोळ्यांना खाज येण्याचा त्रास होत असलेला आढळला. डोळ्याच्या त्रासाची लक्षणं आढळलेल्या सुमारे 37 टक्के रुग्णांना कोविड-19ची लागण झालेली होती, तर उर्वरित 63 टक्के लोकांना गंभीर स्वरूपाचा संसर्ग झाला होता, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

हे वाचा - कोरोनाची तिसरी लाट अटळ पण...; भारतातील तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

दुसऱ्या सेटमध्ये, सुमारे 52 टक्के रुग्णांना मध्यम स्वरूपाचा आजार होता तर 48 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना गंभीर स्वरूपाचा संसर्ग होता. यावरून 17.5 टक्के रुग्णांमध्ये आरटी-पीसीआर चाचणीत (RTPCR) अश्रूंचे नमुने तपासण्यात आले तेव्हा त्यांना कोविड -19 झाल्याचे स्पष्ट झालं. त्यापैकी 9.16 टक्के म्हणजेच 11 रूग्णांना डोळ्यांचे त्रास जाणवत होते तर 8.33 टक्के म्हणजेच 10 रुग्णांना असा कोणताच त्रास झाला नाही. यावरून कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण डोळ्याचा कोणताही विकार नसतानाही डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंच्या माध्यमातूनही या विषाणूचा संसर्ग पसरवू शकतात, हे स्पष्ट झाल्याचं या अभ्यास अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नेत्र रोग तज्ज्ञांनी अधिक काळजी घेणं आवश्यक असून रुग्णांची तपासणी करताना रुग्णांपासून सुरक्षित अंतर राखणं आवश्यक आहे.

First published:

Tags: Corona spread, Coronavirus, Tears