नवी दिल्ली, 22 मे : कोरोना व्हायरसवर (Coronavirus) मात करुन बरे झालेल्या रुग्णांसाठी अतिशय चांगली बातमी समोर आली आहे. कोरोनातून बरे झालेल्या 96 टक्के रुग्णांच्या (Corona Patients) शरीरामध्ये एक वर्षानंतरही अँटिबॉडी (Antibodies) राहिल्या असल्याचा दावा, जपानच्या योकोगामा सिटी यूनिव्हर्सिटीने एका अभ्यासातून केला आहे. जपानी क्योदो न्यूज एजेन्सीने दिलेल्या माहितीनुसार, यूनिव्हर्सिटीने मागील वर्षी कोरोना संक्रमित झालेल्या जवळपास 250 लोकांवर अभ्यास केला आहे.
योकोगामा सिटी यूनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासातील व्यक्तींचा वयोगट 21 ते 78 वर्ष इतका होता. हे सर्व लोक मागील वर्षी फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान कोरोनाबाधित झाले होते. या अभ्यासातील ज्या रुग्णांमध्ये सर्वाधिक लक्षणं आढळली होती, त्यांच्या शरीरात एक वर्षभरानंतरही अँटिबॉडी होत्या. तसंच ज्या रुग्णांना थोडीच लक्षणं होती किंवा अजिबातच लक्षणं नव्हती, अशा 97 टक्के रुग्णांमध्ये 6 महिन्यांपर्यंत अँटिबॉडी राहिल्याचं, या अभ्यासातून सांगण्यात आलं आहे.
या यूनिव्हर्सिटी अभ्यासात असंही आढळलं, की गेल्या वर्षी 69 टक्के रुग्ण, ज्यांच्यामध्ये काहीचं लक्षणं आढळली नव्हती, त्यांच्या शरीरात जवळपास 6 महिन्यांपर्यंत कोरोनाच्या साऊथ अफ्रिकी वेरिएंटशी लढण्याच्या अँटिबॉडी होत्या.
75 टक्के लोकांमध्ये भारतीय वेरिएंटला हरवणाऱ्या अँटिबॉडी तयार झाल्या. तसंच 81 टक्के लोकांमध्ये ब्राझिलियन वेरिएंट आणि 85 टक्के लोकांमध्ये ब्रिटन वेरिएंटला हरवणाऱ्या अँटिबॉडी तयार झाल्या. परंतु या वर्षात या सर्व आकड्यांमध्ये कमी येण्याचा दावाही या अभ्यासातून करण्यात आला आहे.
या अभ्यासानुसार, कोरोना महामारी सुरू झाल्याच्या पहिल्या महिन्यात, संक्रमित झालेल्या लोकांना वॅक्सिन देणं अतिशय आवश्यक आहे. विशेषकरुन असे रुग्ण, ज्यांना कोरोनाची थोडी किंवा अजिबातच लक्षणं दिसली नाहीत. या लोकांनी लस घेतली नाही, तर त्यांना कोरोनाच्या ब्रिटन, साऊथ अफ्रिका आणि ब्राझिलियन वेरिएंटपासून धोका असल्याचं या अभ्यासातून सांगण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona patient, Corona vaccine, Coronavirus, Sanjeevani