जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / 'इंडियन व्हेरियंट' असा उल्लेख असलेल्या सोशल मीडियावरील पोस्ट हटवा, केंद्र सरकारचे आदेश

'इंडियन व्हेरियंट' असा उल्लेख असलेल्या सोशल मीडियावरील पोस्ट हटवा, केंद्र सरकारचे आदेश

'इंडियन व्हेरियंट' असा उल्लेख असलेल्या सोशल मीडियावरील पोस्ट हटवा, केंद्र सरकारचे आदेश

. कोरोना विषाणूच्या इंडियन व्हेरियंट संदर्भातला (Coronavirus Indian Variant) सोशल मीडियावरील मजकूर तातडीने हटवावा, असे आदेश देणारं पत्र केंद्र सरकारने विविध सोशल मीडिया कंपन्यांना लिहिलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 22 मे : कोविड-19 (Covid19) संदर्भातल्या खोट्या आणि चुकीच्या माहितीच्या (Misinformation) प्रसाराला आळा घालण्यासाठी केंद्रानं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. कोरोना विषाणूच्या इंडियन व्हेरियंट संदर्भातला (Coronavirus Indian Variant) सोशल मीडियावरील मजकूर तातडीने हटवावा, असे आदेश देणारं पत्र केंद्र सरकारने विविध सोशल मीडिया कंपन्यांना लिहिलं आहे. शुक्रवारी (21मे) सूत्रांनी याबाबतची माहिती दिली. कोरोना विषाणूच्या B.1.617 या व्हेरियंटला इंडियन व्हेरियंट म्हणावं, असं जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सांगितलेलं नाही. तरीही, ‘कोरोना विषाणूचा इंडियन व्हेरियंट वेगवेगळ्या देशांत पसरत आहे,’ अशी चुकीची माहिती सोशल मीडियावर (Social Media) शेअर केली जात आहे. त्यामुळे, तो मजकूर तातडीने हटवला जावा,’ असं पत्र केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाने (IT Ministry) सगळ्या सोशल मीडिया कंपन्यांना (Social Media Companies) पाठवल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीआहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (Health & Family Welfare Ministry) 12 मे रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात हे आधीच स्पष्ट केलं आहे, की कोरोना विषाणूच्या एखाद्या विशिष्ट व्हेरियंटला इंडियन व्हेरियंट असं नाव देण्यात आलेलं नाही. त्यामुळे कोरोना विषाणूचा इंडियन व्हेरियंट असा उल्लेख असलेला, त्याचा संदर्भ देणारा मजकूर सर्व सोशल मीडियावरून तातडीने हटवला जावा, अशा सूचना माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून सोशल मीडिया कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून कोरोना विषाणूबद्दलच्या खोट्या आणि चुकीच्या माहितीच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी काय करता येईल, याबद्दलच्या मार्गदर्शक सूचना (Advisories) इलेक्ट्रॉनिक्स (Electronics) आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून याआधी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. कोरोनाचा संसर्ग जगातल्या सगळ्याच देशांत झाला आहे आणि विषाणूचे वेगवेगळे स्ट्रेन त्याला कारणीभूत आहेत. काही देशांतले स्ट्रेन दुसऱ्या देशांतही पसरल्याचं सिद्ध झालं आहे; मात्र तरीही आपल्या देशाचा उल्लेख विनाकारण एखाद्या घातक स्ट्रेनशी जोडला जाऊ नये, यासाठी अनेक देश दक्ष आहेत. काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिंगापूरमधला कोरोनाचा नवा स्ट्रेन मुलांसाठी घातक ठरत असल्याचं म्हटलं होतं. मात्र याची तातडीने दखल घेऊन सिंगापूरच्या उच्च आयुक्तालयाने स्पष्ट केलं, की सिंगापूरमध्ये कोरोनाचा कोणताही नवा स्ट्रेन नाही. B.1.617.2 हा आधीपासूनच पसरत असलेला स्ट्रेन बहुतांश जणांमध्ये आढळला असून गेल्या काही आठवड्यांत मुलांमध्ये त्याचं प्रमाण जास्त असल्याचं आढळलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात