मराठी बातम्या /बातम्या /देश /

24 तासांत देशात 10667 नवीन रुग्ण, तरी महाराष्ट्रातून आली दिलासादायक आकडेवारी

24 तासांत देशात 10667 नवीन रुग्ण, तरी महाराष्ट्रातून आली दिलासादायक आकडेवारी

गेल्या तीन दिवसांपासून नवीन रुग्णांचा आकडा हा 10 हजारांच्या घरात आहे. आजही 10 हजार 667 नवीन रुग्णांची नोंद झाली.

गेल्या तीन दिवसांपासून नवीन रुग्णांचा आकडा हा 10 हजारांच्या घरात आहे. आजही 10 हजार 667 नवीन रुग्णांची नोंद झाली.

गेल्या तीन दिवसांपासून नवीन रुग्णांचा आकडा हा 10 हजारांच्या घरात आहे. आजही 10 हजार 667 नवीन रुग्णांची नोंद झाली.

  • Published by:  Manoj Khandekar
नवी दिल्ली, 16 जून : भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या आकड्यात जास्त वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून नवीन रुग्णांचा आकडा हा 10 हजारांच्या घरात आहे. आजही 10 हजार 667 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 380 जणांचा मृत्यू झाला आहे. यासह भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 3 लाख 43 हजार 91वर पोहचला आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे देशात सध्या 1 लाख 53 हजार 178 सक्रीय रुग्ण असले तरी निरोगी झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. देशात आतापर्यंत 1 लाख 80 हजार 013 रुग्ण निरोगी झाले आहे. तर, एकूण मृतांची संख्या 9 हजार 900 आहे. दरम्यान, ताज्या आकडेवारीनुसार, भारताचा रिकव्हरी रेट 52.5% वाढला आहे. यात सर्वात जास्त रिकव्हरी रेट हा महाराष्ट्राचा आहे. त्यचबरोबर आसाम, बिहार, छत्तीसगढ़, हरियाणा, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश, मणिपुर, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तराखंड, पश्चिम बंगाल या राज्यांमध्येही निरोगी रुग्णांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रात दररोज 10 हजारहून अधिक रुग्ण निरोगी होत आहेत. त्यामुळं राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा सर्वात जास्त असला तरी, चिंतेची बाब नाही आहे. वाचा-कोरोनाचं कम्युनिटी ट्रान्समिशन? महाराष्ट्रातील सिरो सर्व्हेचा रिपोर्ट जाहीर वाचा-राज्यात पहिल्यांदाच अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढली दुसरीकडे अमेरिका, ब्राझील आणि रशियानंतर आता भारताचा सर्वात जास्त कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत चौथा क्रमांक लागतो. तर, जॉन हॉपकिन्स विद्यापीठानं दिलेल्या माहितीनुसार मृतांच्या आकडेवारीत भारत नव्या क्रमांकावर आहे. तर निरोगी रुग्णांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर. वाचा-कोरोनाच्या संकटात यांना विसरलात; मात्र हा तरुण दररोज 700 कुत्र्यांचं भरतोय पोट
First published:

Tags: Corona, Corona virus in india

पुढील बातम्या