इटानगर, 15 जून : कोरोना रुग्णांची सेवा करताना स्वत:चा कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी डॉक्टर पीपीई सूट (ppe suit) घालतात. मात्र आता याच पीपीई सूटवर काही डॉक्टरांनी आता आपले फोटो (doctors photo on ppe suit) लावलेत. हा फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे आणि यामागील कारण आहे ते कोरोना रुग्ण.
एखादी व्यक्ती रोज तुमच्यासमोर येते, तुमच्यासाठी काहीतरी करते मात्र तिचा चेहरा तुम्हाला दिसत नाही. त्यावेळी तुमच्या मनाची परिस्थिती काय होईल. अशीच काहीशी परिस्थिती सध्या आहे ती कोरोना रुग्णांची. आपण रुग्णालयातील एका खोलीत आहोत. पीपीई सूट घातलेला एखादा डॉक्टर येतो आणि आपल्यावर आवश्यक ते उपचार करून आणि तपासणी करून निघून जातो. या पीपीई सूटमागे आपली सेवा करणारा डॉक्टर नेमका आहे तरी कोण? तो कसा दिसतो? हेदेखील रुग्णाला समजत नाही. याचा कुठे ना कुठे त्याच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
रुग्णावर शारीरिक उपचार जितके महत्त्वाचे आहेत, तितकंच त्याचे मानसिक आरोग्यही जपणं गरजेचं आहे. रुग्ण मानसिकरित्या जितका मजबूत तितकीच त्याच्यामध्ये सुधारणा लवकर होते. हेच लक्षात घेतलं ते अरुणाचल प्रदेशच्या डॉक्टरांनी. चांगलांग जिल्ह्यातील कोरोनाव्हायरस केअर सेंटर्समधील हे डॉक्टर आहेत. या डॉक्टरांनी आपल्या पीपीई सूटवर आपले फोटो लावलेत. चांगलांगचे जिल्हाधिकारी देवांश यादव यांनी आपल्या ट्विटवर हा फोटो शेअर केला आहे.
Our #covidwarriors at Covid care centers in #changlang, bring human touch to patient care by displaying their photographs in front of PPEs!!
Helps in #COVID19 counseling & shows the face of those behind masks to the patients in distress!! pic.twitter.com/YyaNk7RoRd — Devansh Yadav (@Devansh_IAS) June 14, 2020
देवांश यादव म्हणाले, "चांगलांगमधील कोविड केअर सेंटर्समधील आमच्या कोरोना योद्धांनी आपल्या पीपीई सूटच्या समोर आपले फोटो लावलेत. यामुळे या मास्कमागे नेमका चेहरा कुणाचा आहे, हे रुग्णाला समजेल आणि त्याला मानसिकरित्या बरं वाटेल"
हे वाचा - आता फक्त 30 मिनिटांत कोरोनाचं निदान; अँटिजेन टेस्ट किटने होणार चाचणी
इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना यादव यांनी सांगितलं, माझ्या काही मित्रांकडून ऐकलं की न्यूयॉर्कमधील डॉक्टरांनी पीपीई सूटवर आपले फोटो लावायला सुरुवात केली. रुग्ण आपल्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा चेहरा कित्येक आठवडे, कित्येक महिने पाहू शकले नाही. मानवी चेहरा न पाहताच काही रुग्णांचा मृत्यू झाला.
कोरोना रुग्णाची सेवा करण्यात कोरोना योद्धा डॉक्टर कोणतीच कसर सोडत नाही आहेत. आपल्याने जे जे शक्य होईल ते करण्याचा ते प्रयत्न करत आहे. अरुणाचल प्रदेशमधील डॉक्टरांनीही घेतलेल्या या निर्णयाचं सर्वांनी कौतुक केलं आहे.
संपादन - प्रिया लाड
हे वाचा - अनलॉकनंतर ऑफिसला जायची हिंमत होईना; स्वत:ला पुन्हा कसं तयार कराल?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus