मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Afghanistan मध्ये महिलांची स्थिती दिवसेंदिवस वाईट, तालिबान्यांचा आता नवं फर्मान..

Afghanistan मध्ये महिलांची स्थिती दिवसेंदिवस वाईट, तालिबान्यांचा आता नवं फर्मान..

Taliban New Religious Guidelines: तालिबानने दूरचित्रवाणीवरील महिला पत्रकारांना बातम्या सादर करताना हिजाब घालण्यास सांगितले आहे. इस्लामिक आणि अफगाण मूल्यांच्या विरोधात असलेल्या चित्रपटांवर किंवा कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

Taliban New Religious Guidelines: तालिबानने दूरचित्रवाणीवरील महिला पत्रकारांना बातम्या सादर करताना हिजाब घालण्यास सांगितले आहे. इस्लामिक आणि अफगाण मूल्यांच्या विरोधात असलेल्या चित्रपटांवर किंवा कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

Taliban New Religious Guidelines: तालिबानने दूरचित्रवाणीवरील महिला पत्रकारांना बातम्या सादर करताना हिजाब घालण्यास सांगितले आहे. इस्लामिक आणि अफगाण मूल्यांच्या विरोधात असलेल्या चित्रपटांवर किंवा कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

पुढे वाचा ...

काबूल, 22 नोव्हेंबर : अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबानची सत्ता आल्यानंतर रोज नवे कायदे बनवले जात आहेत. यामध्ये विशेषतः महिलांवर बंधने घालण्यात आली आहेत. तालिबान प्रशासनाने रविवारी नवीन 'इस्लामिक धार्मिक मार्गदर्शक तत्त्वे' (Taliabn Rules For Afghan Media) जारी केली, त्यानुसार महिला अभिनेत्रींना देशातील टेलिव्हिजन वाहिन्यांवरील मालिकांमध्ये किंवा डेली सोपमध्ये दाखवता येणार नाही. इतकेच नाही तर तालिबानने महिला अभिनेत्रींना घेऊन बनवल्या जाणाऱ्या सर्व जुन्या मालिकांचे प्रसारण थांबवण्याचे आदेशही दिले आहेत. महिला टीव्ही पत्रकारांनी अँकरिंग करताना हिजाब परिधान करावा, असेही तालिबानच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. एकंदरीत महिलांची स्थिती दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे.

यासोबतच तालिबानने दूरचित्रवाणीवरील महिला पत्रकारांना बातम्या सादर करताना हिजाब घालायलाच हवा, असे सांगितले आहे. प्रेषित मुहम्मद किंवा इतर मान्यवरांबद्दल काहीही दाखवणारे चित्रपट किंवा कार्यक्रम प्रसारित करू नयेत, असे मंत्रालयाने वाहिन्यांना सांगितले आहे. इस्लामिक आणि अफगाण मूल्यांच्या विरोधात असलेल्या चित्रपटांवर किंवा कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

आदेश नाही धार्मिक मार्गदर्शक तत्त्वे सांगितलं

मंत्रालयाचे प्रवक्ते हाकीफ मोहाजीर यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की, “हे नियम नसून धार्मिक मार्गदर्शक तत्त्वे आहेत.” रविवारी संध्याकाळी ही नवीन मार्गदर्शक तत्त्वे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आली. तालिबानने दोहा करारात आश्वासन दिले होते की ते पूर्वीसारखे राज्य करणार नाहीत आणि खुल्या विचाराने आले आहेत. पण तरीही आता महिलांनी काय घालावे आणि काय घालू नये हे ते सांगू लागले आहेत.

लान्स क्लुसनर Taliban च्या प्रेमात; म्हणाला ते तर आमच्यासाठी...

पत्रकारांवर अत्याचार

यासोबतच तालिबानने मीडिया स्वातंत्र्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अफगाणिस्तानमध्ये अनेक पत्रकारांवर हल्ले होत आहेत, त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. 15 ऑगस्ट रोजी देशावर ताबा मिळवणारे तालिबान 20 वर्षांनंतर पुन्हा सत्तेत आले आहे. तालिबान आल्यानंतर इथं असलेलं पश्चिम-समर्थित सरकार पडले. या सरकारच्या काळात अफगाण मीडियाने खूप प्रगती केली आहे. 2001 मध्ये तालिबानची सत्तेतून हकालपट्टी झाल्यानंतर खाजगी क्षेत्रात मोठी गुंतवणूक झाली आहे. डझनभर टीव्ही आणि रेडिओ वाहिन्या सुरू झाल्या आहेत.

शाळांमध्ये बुरखा अनिवार्य

शाळांमध्ये जाणाऱ्या मुलींना बुरखा (Brukha) घालण्याची सक्ती असेल. शिवाय दिवसभरात कमीत कमी वेळा आपला चेहरा दिसेल, याची काळजीदेखील मुलींनी घ्यावी, असे आदेश तालिबाननं काढलें आहेत. शाळेत एका वर्गात जर मुले आणि मुली बसणार असतील, तर त्यांच्यामध्ये अपारदर्शक पडदा लावणं सक्तीचं असणार आहे. मुले आणि मुली एकमेकांना पाहू शकणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागेल.

कॉलेजमध्ये मुले आणि मुली एकत्र असणार नाहीत. मुलींसाठी वेगळे वर्ग भरवावे लागतील.  मुलींना शिकवण्यासाठी महिला शिक्षक असणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये महिला शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत. मात्र, सध्या महिला शिक्षकांची संख्या कमी आहे. त्यामुळे ज्या शाळांमध्ये महिला शिक्षक नसतील, तिथे वयाने ज्येष्ठ शिक्षकांना मुलींना शिकवण्याची परवानगी मिळणार आहे.

Afghanistan news: बागलान प्रांतात 300 तालिबानी ठार, काही कैद; पंजशीर खोरं मिळवण्यासाठी मोठ्या हल्ल्याची तयारी

तालिबानची सत्ता आल्यानंतर अफगाणिस्तानात रस्त्यावरून फिरणाऱ्या महिलांनी बुरखे घालायला सुरुवात केली आहे. त्या अगोदर अफगाणिस्तानात कमी महिला बुरखा वापरत असत. मात्र, आता तालिबानच्या भीतीने महिलांनी बुरखा वापरायला सुरुवात केल्याचं चित्र आहे.

First published:
top videos

    Tags: Actress, Afghanistan, Taliban