मुंबई, 1 ऑक्टोबर : मागचे काही महिने अफगाणिस्तान क्रिकेटसाठी खूपच कठीण ठरले आहेत. जेव्हापासून तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा (Taliban Captures Afghanistan) केला आहे, तेव्हापासून त्यांच्या क्रिकेट टीमचं भविष्य अंधारात गेलं आहे. पण अफगाणिस्तानचा मुख्य प्रशिक्षक लान्स क्लुसनर (Lance Klusener) याने तालिबानचं कौतुक केलं आहे. ते क्रिकेट टीमला समर्थन देत आहेत आणि पूर्णपणे टीमच्या बाजूने उभे आहेत. टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे, असं क्लुसनर म्हणाला. ‘तालिबान क्रिकेटचं समर्थन करत आहे, सोबतच प्रसारही करत आहे. ते आमची टीम बघून खूप खूश आहेत. आम्ही पुढे जावं असं त्यांना वाटत आहे. अफगाणिस्तानसाठी हे मोठ्या बदलासारखं आहे. त्यांना आपल्या पायावर उभं राहायला वेळ लागेल,’ असं क्लुसनर एएफपीसोबत बोलताना म्हणाला. टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार अफगाणिस्तान क्रिकेट टीम आता तालिबानचा झेंडा (Taliban Flag) घेऊन खेळेल, पण आयसीसीने याला नकार दिला आहे, त्यामुळे अफगाणिस्तानच्या टी-20 वर्ल्ड कप खेळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. क्लुसनरला मात्र अफगाणिस्तान टी-20 वर्ल्ड कप खेळेल, याचा विश्वास आहे. अफगाणिस्तानला मिळाला नाही व्हिजा दुसरीकडे अफगाणिस्तानला अजूनपर्यंत युएईचा व्हिजा मिळालेला नाही. आम्हाला टीमसाठी एक महिना आधीच युएईमध्ये कॅम्प लावायचा होता, पण असं करता आलं नाही. टीमचे प्रमुखे खेळाडू टी-20 लीग खेळत आहेत, याचा फायदा टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी होईल, अशी प्रतिक्रिया क्लुसनरने दिली. टी-20 वर्ल्ड कपसाठी अफगाणिस्तानने मजबूत टीमची निवड केली आहे. टीममध्ये मोहम्मद शहजादचं पुनरागमन झालं आहे, पण टीमची निवड होताच राशिद खानने कॅप्टन्सी सोडली आहे. आता मोहम्मद नबीला पुन्हा एकदा टी-20 वर्ल्ड कपचं नेतृत्व देण्यात आलं आहे. टी-20 वर्ल्ड कपसाठी अफगाणिस्तानची टीम राशिद खान, रहमनुल्लाह गुरबाज, हजरतुल्लाह जजाई, उस्मान घानी, असगर अफगान, मोहम्मद नबी, नजीबुल्लाह जादरान, हशमतुल्लाह शाहिदी, मोहम्मद शहजाद, मुजीब उर रहमान, करीम जन्नत, गुलबदीन नईब, नवीन उल हक, हामिद हसन, शराफुद्दीन अशरफ, दौलत जादरान, शपूर जादरान, कायस अहमद
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.