मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

'चीनच्या पैशांवर तालिबानच्या सत्तेची कोलांटउडी', मदतीची रक्कम ऐकून व्हाल थक्क!

'चीनच्या पैशांवर तालिबानच्या सत्तेची कोलांटउडी', मदतीची रक्कम ऐकून व्हाल थक्क!

आर्थिक मदतीसह चीनने तालिबानला आंतरराष्ट्रीय पातळीवर सरकार म्हणूनदेखील मान्यता दिली असल्याने आता अफगाणिस्तानमध्ये चीन हा मोठा खेळाडू म्हणून पुढे येत आहे.

    दिल्ली, 3 सप्टेंबर : तब्बल वीस वर्षांनंतर तालिबान (Afghanistan) सत्तेत परतला आहे. तालिबानला (Taliban) सत्तेत आणण्यात चीनने (China) मोठी आणि महत्वाची भूमिका बजावली आहे. आर्थिक मदतीसह (China Financial Aid To Taliban) चीनने तालिबानला आंतरराष्ट्रीय पातळीवर सरकार म्हणूनदेखील मान्यता दिली असल्याने आता अफगाणिस्तानमध्ये चीन हा मोठा खेळाडू म्हणून पुढे येत आहे. चीन सातत्याने तालिबानी नेत्यांच्या संपर्कात असून त्यांना छुप्या पद्धतीने होईल ती मदत करत आहे. अमेरिकेने अफगाणिस्तान सरकारच्या पैशांची खाती गोठवल्यानंतर आता चीन तालिबानला आर्थिक मदत करत आहे. तालिबानमध्ये नंबर दोनच्या स्थानावर असलेल्या मुल्ला अब्दुल गनी बरादर याने काही दिवसांपूर्वी चीनची राजधानी बीजिंगमध्ये चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची भेट घेतली होती. भेटीचे कारण हे स्पष्ट होते की तालिबान चीनकडून आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि काही आर्थिक मदतीची मागणी करणार होता. चीनकडून या मागणीला सकारात्मक प्रतिसादही मिळाला होता. कारण असं म्हटलं जातं कि अफगाणिस्तानमध्ये 3 ट्रिलियन डॉलर (200 लाख कोटी भारतीय रुपये) ऐवढी खनिज संपत्ती आहे, आणि त्यावर चीनचा डोळा आहे. त्यामुळे चीनलाही हा सौदा फायद्याचाच आहे. शुक्रवारी नमाजानंतर होणार तालिबान सरकारची घोषणा? असं असेल स्वरूप चीन तालिबानला काय मदत करणार? चीनचा पाकिस्तानमधून जाणारा सिपेक कॉरिडॉर हा चीमसाठी अतिशय महत्वाचा प्रोजेक्ट आहे. अफगाणिस्तानलाही यात सामील करण्याचा चीनचा प्रयत्न आगामी काळात आहे. त्यामुळे हा आर्थिक सौदा चीनला प्रचंड फायदेशीर आहे. दुसरीकडे चीनमधील उईगर मुस्लीमांच्या प्रश्नावर तालिबानने काही भुमिका घेऊ नये, असं चीनला वाटतं त्यामुळे चीन अफगाणिस्तानात लक्ष घालून आहे. त्याचबरोबर चीन भविष्यात अफगाणिस्तानात मोठी आर्थिक गूंतवणूक करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता अफगाणिस्तानात अरबो रुपयांची गूंतवणूक होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
    Published by:Atik Shaikh
    First published:

    Tags: Afghanistan, China, Financial benefits, Taliban

    पुढील बातम्या