• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • शुक्रवारी नमाजानंतर होणार तालिबान सरकारची घोषणा? असं असेल स्वरूप

शुक्रवारी नमाजानंतर होणार तालिबान सरकारची घोषणा? असं असेल स्वरूप

अफगाणिस्तामध्ये (Afghanistan) तालिबानची (Taliban) सत्ता प्रस्थापित झाली असून शुक्रवारच्या नमाजानंतर (Friday's Namaz) नव्या सरकारची (New government) घोषणा होण्याची शक्यता आहे.

 • Share this:
  काबुल, 2 सप्टेंबर : अफगाणिस्तामध्ये (Afghanistan) तालिबानची (Taliban) सत्ता प्रस्थापित झाली असून शुक्रवारच्या नमाजानंतर (Friday Namaz) नव्या सरकारची (New government) घोषणा होण्याची शक्यता आहे. तालिबाननं काबुलसह अफागाणिस्तानवर विजय मिळवून आता 18 दिवस पूर्ण झाले आहेत. अमेरिकेनं अफगाणिस्तान सोडण्याची औपचारिकतादेखील आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे शुक्रवारच्या नमाजाचा  मुहूर्त साधत तालिबानकडून नव्या सरकारची आणि त्याच्या संभाव्य स्वरुपाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आखुंदजादा असणार प्रमुख तालिबानचे सर्वोच्च नेते आणि कमांडर हिबतुल्लाह अखुंदजादा हेच सरकारचे प्रमुख असणार आहेत. त्यांच्या खाली पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष हे पद तयार केलं जाईल. आखुंदजादा यांच्या सूचनांनुसार आणि मार्गदर्शनानुसार पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष काम करतील, असं सांगण्यात येत आहे. अफगाणिस्तानातील ‘टोलो न्यूज’नं दिलेल्या माहितीनुसार अखुंदजादा हे सरकारचे प्रमुख असतील, यावर शिक्कामोर्तब झालं असून मंत्रीमंडळात कुणाकुणाचा समावेश करायचा, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. परदेशी मान्यतेची आस अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी हे अगोदरच देश सोडून निघून गेलेले आहेत. त्यामुळे नवे सरकार स्थापन करण्याची तांत्रिक अडचण दूर झाल्याचं मानलं जात आहे. तालिबानच्या सरकारला जगातील सर्व देशांनी मान्यता द्यावी, यासाठी तालिबानचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अद्याप अमेरिकेसह कुठल्याही देशाने या सरकारला मान्यता दिलेली नाही. सरकारच्या स्थापनेनंतर जागतिक निकषांवर ते सरकार टिकतं का आणि काही मूलभूत बाबींचं पालन केलं जातं का, याची खातरजमा करूनच सरकारला मान्यता देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. हे वाचा - काबुलचं बंद विमानतळ सुरु करण्याचं काम कतारकडे, उद्यापासून उडणार Domestic Flights पंजशीरचा पेच पंजशीर अद्यापही तालिबानच्या ताब्यात आलेलं नसल्यामुळे त्याबाबत नेमकं काय धोरण निश्चित करायचं, याबाबत तालिबानी नेत्यांमध्ये खल सुरू आहे. एकीकडे पंजशीरवर तालिबानकडून हल्ले चढवले जात असताना दुसऱ्या बाजूला त्यांच्यासोबत तालिबानी नेते चर्चादेखील करत आहेत. सरकार स्थापन करण्याची घोषणा करतानाच तालिबानला पंजशीरबाबतचं आपलं धोरणही जाहीर करावं लागणार आहे. शुक्रवारी तालिबानकडून याबाबत काही ठोस घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून त्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
  Published by:desk news
  First published: