काबूल, 16 ऑगस्ट : अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबानने ताबा मिळवल्यानंतर तेथील परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक अफगाण नागरिकांनी तालिबानी कायद्यांच्या भीतीनं आपला देश सोडायला सुरुवात केली आहे. काबूल विमानतळावर हजारो नागरिक अडकले आहेत. बाहेर देशात जाणारं विमान पकडण्यासाठी सध्या तेथे विमानतळावर प्रचंड गर्दी झाली आहे.
अफगाणिस्तानचे नागरिक मिळेल त्या मार्गाने देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र तालिबानने अफगाणिस्तानच्या सर्व सीमांवर ताबा मिळवला असल्याने, देशाबाहेर पडण्यासाठी हवाईमार्ग हा एकमेव पर्याय आहे. अनेक लोक या देशातून बाहेर पडण्यासाठी धडपडत असून विमानतळावर झुंबड झाली आहे. अनेक जण विमानाच्या टपावरही चढून प्रवास करण्यास तयार आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अनेक नागरिक शक्य तितक्या लवकरात लवकर अफगाणिस्तानातून बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. Airbus A340 वर नागरिक अक्षरश: तुटून पडले आहेत. येथील परिस्थितीचा व्हिडीओ समोर आला आहे.
🇦🇫 Désolations à l’aéroport de Kaboul. De nombreux civils tentent de fuir l’Afghanistan au plus vite. Un Airbus A340 de Kam Air a été pris d’assaut par des civils. pic.twitter.com/dU48e5T3wn
— air plus news (@airplusnews) August 16, 2021
अशाप्रकारचा भयंकर व्हिडीओ समोर आला आहे. काबूल विमानतळावरुन USAF's च्या C-17A या वाहतूक विमानाने उड्डाण केलं. देशाबाहेर पडण्यासाठी अनेक अफगाणी तरुण या विमानाच्या थेट इंजिनवर बसून प्रवास करत असल्याचे व्हिडीओ समोर आले. कसंही करून देशाबाहेर पडण्यासाठी त्यांचा हा जीवघेणा प्रवास सुरू होता. याचदरम्यान या विमानाने उड्डाण केल्यानंतर लँडिंग गिअर पकडून बसलेले अफगाणी अचानक खाली पडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
यातच काबूल विमानतळावर गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. या गोळीबारात 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Kabul, Taliban