अफगाणिस्तान, 04 सप्टेंबर: तालिबाननं (Taliban) अफगाणिस्तानात (Afghanistan)आपला कब्जा मिळवल्यानंतर तेथील परिस्थिती भयानक आहे. आता तालिबाननं पंजशीरवरही कब्जा केला (Taliban Seized the Panjshir Valley) आहे. त्यातच तालिबाननं पंजशीरवर कब्जा केल्याचा दावा केल्यानंतर हवेत गोळीबार केला आहे. तालिबानी लढाऊंनीही आनंद व्यक्त करत हवेत गोळीबार केल्याचं वृत्त समोर आलं आहे. असवाका न्यूज एजन्सीनं दिलेल्या वृत्तानुसार, तालिबानी लढाऊंनी केलेल्या या गोळीबारात दोन लहान मुलांसह काही लोकांचा मृत्यू झाला आहे. तर काही नागरिक जखमी देखील झालेत. तालिबानने दावा केला की त्यांनी पंजशीर प्रांतावर कब्जा केला आहे. मात्र तर रेजिस्टेंस फोर्सेज (बंडखोर गट) नं हा दावा फेटाळून लावला आहे. तसेच त्यांनी तालिबानचं मोठं नुकसान केल्याचा दावा करण्यात आला आहे. एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ, एक हजार पानी आरोपपत्र दाखल तालिबानच्या या गोळीबारानंतर जखमी लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह (Former Vice President Amrullah Saleh) यांनी त्यांच्या देश सोडल्याच्या बातम्या फेटाळून लावत ही बातमी खोटी असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय, तालिबान्यांनी पंजशीर खोऱ्यावर कब्जा केल्याचीही त्यांनी पुष्टी केलेली नाही. अमरुल्ला सालेहनं ट्वीट केलं, की प्रतिकार चालू आहे आणि चालू राहील. मी माझ्या मातीसह इथे आहे, माझ्या मातीसाठी उभा आहे आणि त्याच्या सन्मानाचं रक्षण करतोय. मुंबई पोलिसांचा दणका, मास्क न घालता रस्त्यावर फिरणाऱ्यांवर धडक कारवाई शुक्रवारी तालिबाननं नवीन अफगाणिस्तान सरकारच्या स्थापनेची तारीख एका दिवसासाठी पुढे ढकलली होती. नवीन अफगाणिस्तान सरकारची स्थापना जी शुक्रवारी केली जाणार होती, ती आता एक दिवस उशिरा होणार आहे, असे दहशतवादी गटाचे प्रवक्ते झबीउल्ला मुजाहिद यांनी शुक्रवारी सांगितलं. मुजाहिद म्हणाले की, नवीन सरकारच्या स्थापनेची घोषणा आता शनिवारी (आज) केली जाईल. सूत्रांनी सांगितलं की कतारमधील तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे अध्यक्ष मुल्ला अब्दुल गनी बरदार हे तालिबान सरकारचे प्रमुख असण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







