मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ED कडून एकनाथ खडसेंविरोधात एक हजार पानी आरोपपत्र दाखल, पत्नी-जावयाचाही आरोपी म्हणून समावेश

ED कडून एकनाथ खडसेंविरोधात एक हजार पानी आरोपपत्र दाखल, पत्नी-जावयाचाही आरोपी म्हणून समावेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे  (Eknath Khadse) यांच्या अडचणीत आणखीन भर पडली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

पुणे, 04 सप्टेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या अडचणीत आणखीन भर पडली आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा (Pune land case) प्रकरणी ईडीकडून एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. ईडीनं एक हजार पानांचे आरोपपत्र (Charge Sheet)दाखल केलं आहे. या आरोपपत्रात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे. या सर्वांवर ईडीकडून मनी लॉड्रिंगचा आरोप लावला आहे.

दरम्यान शुक्रवारी याप्रकरणी अटकेत असलेल्या गिरीश चौधरी यांचा जामीन अर्जही मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळून लावला.

IND vs ENG: बुमराहनं केली मोठी चूक, टीम इंडियाला बसला फटका! 

एकनाथ खडसे, त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून एप्रिल 2017 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

खडसेंच्या 5 कोटींच्या मालमत्तेवर EDची कारवाई

गेल्या आठवड्यात ईडीनं एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची मालमत्ता जप्त केली. एकनाथ खडसे यांची लोणावळा (Lonavla)आणि जळगाव (Jalgaon) येथील 5 कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. 4 कोटी 86 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आणि बँकेतील 86 लाख 28 हजार रुपये असा या कारवाईचा तपशील आहे.

First published:

Tags: Eknath khadse