मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मास्क न घालणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांची धडक कारवाई, एका दिवसात 6 हजारांहून अधिक लोकांना दणका

मास्क न घालणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांची धडक कारवाई, एका दिवसात 6 हजारांहून अधिक लोकांना दणका

गणेशोत्सव  (Ganeshotsav 2021) अवघ्या आठवड्यावर आल्यानं मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे.

गणेशोत्सव (Ganeshotsav 2021) अवघ्या आठवड्यावर आल्यानं मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे.

गणेशोत्सव (Ganeshotsav 2021) अवघ्या आठवड्यावर आल्यानं मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे.

मुंबई, 04 सप्टेंबर: मुंबईत (Mumbai Corona Virus)कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात आली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा (Third Wave) धोका वर्तवण्यात आला आहे. त्यातच गणेशोत्सव (Ganeshotsav 2021) अवघ्या आठवड्यावर आल्यानं मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. मुंबईत सर्व पोलीस (Mumbai Police Stations) स्टेशनना सतर्क राहावे, असे आदेश देण्यात आलेत. त्याचप्रमाणे मास्क (Face Mask) न घालता रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश सह आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था विश्वास नांगरे पाटील यांनी बुधवारी सर्व पोलीस ठाण्यांना दिलेत. या आदेशानंतर पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

गुरुवारी मुंबईत मास्क न घालता रस्त्यावर फिरणाऱ्यांना विरोधात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कारवाई केली आहे. एका दिवसात पोलिसांनी सहा हजारांहून अधिक लोकांकडून दंड वसूल केला आहे. सर्वात मोठी कारवाई ही दिंडोशी ते दहिसरपर्यंत असलेल्या भागात करण्यातआली. पोलिसांनी या भागातून एकूण 719 लोकांकडून दंड वसूल केला आहे.

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतून मोठी दिलासादायक बातमी

त्यापाठोपाठ काळाचौकी ते सायनपर्यंत पोलिसांनी 666 जणांवर कारवाई केली आहे. कारवाई करण्यात आलेल्या लोकं रस्त्यावर मास्कविना फिरत होते. चेंबूर ट्रॉम्बे या भागात 646 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. दादर, शिवाजी पार्क, माहिम, विनोबा भावे नगर, कुर्ला या भागात गुरुवारी पोलिसांनी 555 लोकांवर कारवाई केली.

पायधुनीपासून ते मलबार हिलपर्यंत पोलिसांनी 549 लोकांवर कारवाई केली आहे. भायखळा ते वरळी पर्यंतच्या भागात मास्क न घालणाऱ्या 542 लोकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानंतर घाटकोपरपासूनते मुलुंड याभागात 553 जणांवर कारवाई झाली आहे.

First published:

Tags: Coronavirus, Mumbai police