मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

काबूल विमानतळाजवळून तालिबान दहशतवाद्यांनी केलं 150 जणांचं अपहरण, बऱ्याच भारतीयांचा समावेश

काबूल विमानतळाजवळून तालिबान दहशतवाद्यांनी केलं 150 जणांचं अपहरण, बऱ्याच भारतीयांचा समावेश

एक मोठी समोर आली आहे. तालिबाननं (Taliban) 150 लोकांचं अपहरण केलं आहे. यात बरेच जण भारतीय (Indians) असल्याचं समजतंय.

एक मोठी समोर आली आहे. तालिबाननं (Taliban) 150 लोकांचं अपहरण केलं आहे. यात बरेच जण भारतीय (Indians) असल्याचं समजतंय.

एक मोठी समोर आली आहे. तालिबाननं (Taliban) 150 लोकांचं अपहरण केलं आहे. यात बरेच जण भारतीय (Indians) असल्याचं समजतंय.

  काबूल, 21 ऑगस्ट:  एक मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार काबूल एअरपोर्टहून (Kabul Airport) तालिबाननं (Taliban) 150 लोकांचं अपहरण केलं आहे. धक्कादायक म्हणजे यात बरेच जण भारतीय (Indians) असल्याचं समजतंय. अपहरण करण्यात आलेल्या लोकांच्या लोकेशनबद्दल अद्याप काही माहिती मिळू शकलेली नाही.  या लोकांचं अपहरण करण्यामागे तालिबानचा काय हेतू आहे हे अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान तालिबानचे प्रवक्ते अहमदुल्लाह वासेनं 150 लोकांचे अपहरण झालं असल्याचं वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. तालिबानचे म्हणणे आहे की,  लोकांचं अपहरण केलं नसून त्यांना सुरक्षित विमानतळावर पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. दैनिक भास्करनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. या घटनेसंदर्भात काबूलशी संबंधित सूत्रांचे म्हणणं आहे की, तालिबानने ज्या लोकांना ताब्यात घेतलं आहे, त्यांना कागदपत्रे तपासण्यासाठी नेल्याची शक्यता आहे. त्याचवेळी काबूलमधील एका विश्वासू पत्रकारानं हे वृत्त खोटं असल्याचं म्हटलं आहे. ऑपरेशन Airlift: अफगाणिस्तानातील 85 भारतीय पोहोचणार मायदेशी  काबूलहून 85 भारतीय आज येणार दिल्लीला अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान (Taliban) नं कब्जा केल्यानंतर परिस्थिती चिंताजनक आहे. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना (Indians)बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता तेथून 85 भारतीयांना घेऊन भारतीय हवाई (Indian Air Force)दलाचं C-130J विमान भारतात परतत आहे. असे सांगितले जात आहे की विमान इंधनासाठी ताजिकिस्तानमध्ये (Tajikistan) उतरले होते. हे विमान काबूलहून दिल्लीला येत आहे. यापूर्वी मंगळवारी सुमारे 140 लोकं भारतात परत आले. यामध्ये भारतीय नागरिक, पत्रकार, मुत्सद्दी, दूतावासातील इतर कर्मचारी आणि भारतीय सुरक्षा कर्मचारी यांचा समावेश होता. भाजपची जन आशीर्वाद यात्रा अडचणीत, मुंबई पोलिसांचा दणका परराष्ट्र मंत्रालयाकडून एक विशेष सेल तयार अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर भारताकडून आपल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम केले जात आहे. दूतावासात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं. मात्र अजूनही अफगाणिस्तानमध्ये मोठ्या संख्येनं लोक अडकले आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या लोकांना परत आणण्यासाठी विशेष व्यवस्था केली असून स्पेशल अफगानिस्तान सेल तयार करण्यात आला आहे. 16 ऑगस्टच्या संध्याकाळी परराष्ट्र मंत्रालयाने एक विशेष अफगाणिस्तान सेलची स्थापना केली. ज्याचं उद्दिष्ट अफगाणिस्तानकडून मदतीसाठी आलेल्या विनंतीवर मॉनिटर करणं आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: Afghanistan, Kabul, Taliban

  पुढील बातम्या