मराठी बातम्या /बातम्या /देश /

काबूलहून वायूसेनेच्या विमानानं घेतलं उड्डाण, अफगाणिस्तानातील 85 भारतीय पोहोचणार आज दिल्लीला

काबूलहून वायूसेनेच्या विमानानं घेतलं उड्डाण, अफगाणिस्तानातील 85 भारतीय पोहोचणार आज दिल्लीला

अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना (Indians)बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना (Indians)बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना (Indians)बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

  • Published by:  Pooja Vichare
काबूल, 21 ऑगस्ट: अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान (Taliban) नं कब्जा केल्यानंतर परिस्थिती चिंताजनक आहे. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना (Indians)बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता तेथून 85 भारतीयांना घेऊन भारतीय हवाई (Indian Air Force)दलाचं C-130J विमान भारतात परतत आहे. असे सांगितले जात आहे की विमान इंधनासाठी ताजिकिस्तानमध्ये (Tajikistan) उतरले होते. हे विमान काबूलहून दिल्लीला येत आहे. यापूर्वी मंगळवारी सुमारे 140 लोकं भारतात परत आले. यामध्ये भारतीय नागरिक, पत्रकार, मुत्सद्दी, दूतावासातील इतर कर्मचारी आणि भारतीय सुरक्षा कर्मचारी यांचा समावेश होता. परराष्ट्र मंत्रालयाकडून एक विशेष सेल तयार अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर भारताकडून आपल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम केले जात आहे. दूतावासात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं. मात्र अजूनही अफगाणिस्तानमध्ये मोठ्या संख्येनं लोक अडकले आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या लोकांना परत आणण्यासाठी विशेष व्यवस्था केली असून स्पेशल अफगानिस्तान सेल तयार करण्यात आला आहे. 16 ऑगस्टच्या संध्याकाळी परराष्ट्र मंत्रालयाने एक विशेष अफगाणिस्तान सेलची स्थापना केली. ज्याचं उद्दिष्ट अफगाणिस्तानकडून मदतीसाठी आलेल्या विनंतीवर मॉनिटर करणं आहे. भाजपची जन आशीर्वाद यात्रा अडचणीत, मुंबई पोलिसांचा दणका या टीममध्ये सुमारे 20 तरुण आहेत, जे या मिशनमध्ये 24*7 काम करत आहेत. अफगाणिस्तानातून येणाऱ्या विनंतीचं निरीक्षण करणं. त्यानंतर त्यांच्याशी संबंधित व्यवस्था करणं हे या टीमचं मुख्य काम आहे. या दरम्यान व्हॉट्सअॅप, ई-मेलवरुन काम केले जात आहे. अफगाणिस्तानात अडकलेल्या लोकांच्या स्थितीचा आढावा घेतला जात आहे आणि त्यानंतर त्यांच्या अहवालानुसार एक कृती आराखडा तयार केला जात आहे.
First published:

Tags: Afghanistan, Kabul, Taliban

पुढील बातम्या