मुंबई, 21 ऑगस्ट: भाजपच्या (BJP) जन आशीर्वाद यात्रेला (Jan Ashirwad Yatra) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) चांगलाच दणका दिला आहे. केंद्र सरकारची कामं जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी भाजपनं जन आशीर्वाद यात्रा सुरु केली. मात्र या यात्रेवर पोलिसांनी 36 हून अधिक गुन्हे दाखल केलेत. कोविडच्या (Covid 19) पार्श्वभूमीवर गर्दी जमवायला परवानगी नसताना देखील भाजपनं (BJP) जन आशीर्वाद यात्रा काढली. या पार्श्वभूमीवर मुंबईत (Mumbai) 36 ठिकाणी गुन्हे दाखल झालेत. 19 ऑगस्ट रोजी विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर, गोवंडी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर आता गुन्ह्यांची संख्या 36 वर पोहोचली आहे. जन आशीर्वाद यात्रेची परवानगी नसतानाही ती काढल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
Mumbai | 17 more FIRs have been registered by Mumbai Police against BJP’s Jan Ashirwad Yatra for violation of COVID-19 protocols. A total of 36 FIRs have been registered so far.
— ANI (@ANI) August 21, 2021
कपिल पाटील यांच्याही जन आशीर्वाद यात्रेवर कारवाई भारतीय जवानांना मोठं यश, जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार मंगळवारी संध्याकाळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या स्वागतासाठी भाजपच्या नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी महापालिका मुख्यालयापासून जनआशीर्वाद यात्रा काढली होती. या यात्रेत कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने एनआरआय पोलिसांनी आयोजकांसह 70 ते 80 भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केल्याचं समजतंय.