बर्लिन, 25 ऑगस्ट: अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबाननं (Taliban) कब्जा केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांच्यासह अनेक राजकारणी आणि मंत्री देश सोडून पळून गेलेत. यापैकी बरेच लोकं अन्य देशात सामान्य लोकांसारखं जगत आहेत. अशातच अफगाणिस्तानचे माजी दळणवळण मंत्र्याचा फोटो समोर आला आहे. माजी मंत्री सय्यद अहमद शाह सादत (Sayed Ahmad Shah Sadat) सध्या जर्मनीच्या लिपझिग शहरात राहत आहेत. सय्यद अहमद गेल्या 2 महिन्यांपासून येथे पिझ्झा डिलीव्हरी बॉय म्हणून काम करत आहे.
त्यांचा फोटो बघून विश्वास ठेवणं कठीण आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, सय्यद अहमद शाह सादत डिसेंबर 2020 मध्ये काबूल सोडून जर्मनीला पळून गेले. सादत हे उच्चशिक्षित आहे. त्यांनीऑक्सफर्ड विद्यापीठातून कम्युनिकेशनमध्ये MScs केले आहे. ते इलेक्ट्रिकल इंजिनिअर देखील आहे.
सय्यद अहमद शाह यांनी जगातील 13 मोठ्या शहरांमध्ये 23 वर्षे विविध प्रकारची कामे केली आहेत.
दारू पिऊन मारझोड करणाऱ्याला कुटुंबानं घडवली अद्दल; न्यायालयही झालं हैराण
सय्यद अहमद शाह एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, सुरुवातीच्या काळात मला या शहरात राहण्यासाठी कोणतंही काम मिळत नव्हतं. कारण मला जर्मन भाषा येत नाही.
पुढे ते सांगतात की, सध्या पिझ्झा डिलिव्हरीचं काम मी केवळ जर्मन भाषा शिकण्यासाठी करत आहे. या नोकरीच्या माध्यमातून मी शहरातल्या वेगवेगळ्या भागात जाऊन लोकांची भेट घेत आहे. जेणेकरून येत्या काही दिवसांत मी स्वतःमध्ये बदल करुन आणि दुसरी नोकरी मिळवू शकेन.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Germany