मुंबई, 25 ऑगस्ट: दारू पिऊन मारझोड करतो म्हणून मुंबईतील एका व्यक्तीला त्याचाच कुटुंबानं लैंगिक छळाच्या (Sexual Molestation) प्रकरणात गुंतवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित व्यक्तीला पोक्सो अंतर्गत अटक (Man Arrested under POCSO crime) करण्यात आली होती. पण घटनेच्या एक वर्षांनंतरही कोणताही ठोस पुरावा समोर न आल्यानं न्यायालयानं संबंधित व्यक्तीची निर्दोष मुक्तता (court acquitted) केली आहे. संबंधित आरोपी व्यक्ती दारू पिऊन मारझोड करायचा, त्यामुळेचं कुटुंबीयांनी खोटा आरोप करत त्याला तुरुंगवारी घडवल्याचं तपासात समोर आलं आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
एका वर्षापूर्वी मुंबईतील एका 48 वर्षीय व्यक्तीला बाल लैंगिक अत्याचाराच्या कलमांतर्गत अटक करण्यात आली होती. संबंधित व्यक्तीनं आपल्या 17 वर्षीय पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपी लावण्यात आला होता. परंतु कोर्टात आरोपीच्या पत्नीनं आणि मुलीनं संबंधित सर्व आरोपांचा इन्कार केला आहे. आरोपी व्यक्तीला दारूचं व्यसन होतं. दारू पिऊन तो कुटुंबीयांना मारहाण करायचा. त्याच्या जाचाला कंटाळून कुटुंबीयांनी मुलीवर लैंगिक छळ केल्याचा आरोप लावल्याचं आरोपीच्या पत्नीनं न्यायालयात सांगितलं आहे.
हेही वाचा-...म्हणून प्रेयसीचं हात-पाय अन् मुंडकं केलं धडावेगळं; पुण्याला हादरवणारी घटना
पोलिसांनी आरोपी व्यक्तीला एक वर्षभरापूर्वी अटक करून त्याची रवानगी तुरुंगात केली होती. संबंधित गुन्हा पोक्सोअंतर्गत दाखल झाल्यानं आरोपीची थोडक्यात सुटका होणं शक्य नव्हतं. दरम्यान संबंधित मुलीवर लैंगिक छळ झाल्याचा कोणताच पुरावा पोलिसांना सापडला नाही. याव्यतिरिक्त संबंधित मुलीची वैद्यकीय चाचणी केली असता, त्यातही लैंगिक छळ झाला नसल्याचं समोर आलं होतं.
हेही वाचा-Hand gloves घालून अवयवांना स्पर्श केला तर तो अपराध नव्हे काय?- ऍटॉर्नी जनरल
एवढंच नाही तर कुटुंबीयांनी संबंधित व्यक्तीवर जेव्हा आरोप केला. तेव्हा संबंधित मुलगी अल्पवयीन नसल्याचंही पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे आरोपीवर पोक्सो अंतर्गत दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा असल्याचं निष्पन्न झालं आहे. आपल्या वडिलांना मानसिक उपचाराची गरज असून ते कोणतेही औषध घेण्यास तयार नसल्याचंही मुलीनं न्यायालयात म्हटलं आहे. पण केवळ मारझोड करतो म्हणून कुटुंबानं केलेली उठाठेव पाहून न्यायालयही हैराण झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Court, Crime news, Mumbai, POCSO