मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

‘मुस्लीम देश कसा चालवायचा ते आमच्याकडून शिका’ तालिबानविरुद्ध Middle East च्या या देशाने दाखवली तीव्र नाराजी

‘मुस्लीम देश कसा चालवायचा ते आमच्याकडून शिका’ तालिबानविरुद्ध Middle East च्या या देशाने दाखवली तीव्र नाराजी

Middle East मधल्या अनेक मुस्लीम देशांनी अफगाणिस्तानात तालिबानचं राज्य आल्यावर त्यांचं अभिनंदन केलं होतं. मात्र आता तालिबानचा क्रूर आणि बुरसटलेला चेहरा समोर आल्यावर कतारने (Qatar unhappy with Taliban rule) त्यांना चांगली चपराक दिली आहे.

पुढे वाचा ...

कतार, 1 ऑक्टोबर : ऑगस्ट महिन्यात तालिबानने अफगाणिस्तान देश (Afghanistan crisis updates) आपल्या ताब्यात घेतला. त्या वेळी मध्य-पूर्व आशियातला मुस्लीम देश असणाऱ्या कतारने तालिबानचं (Muslim countries on Taliban rule) समर्थनही केलं होतं; मात्र आता तालिबानचे विविध निर्णय पाहून कतार तालिबानवर नाराज (Qatar unhappy with Taliban) असल्याचं समोर आलं आहे. कतारचे परराष्ट्र मंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी (Sheikh Mohammed bin Abdulrahman Al Thani) यांनी शिक्षणाप्रती तालिबानची भूमिका अफगाणिस्तानला आणखी मागे नेईल, असं मत व्यक्त केलं आहे. एक देश कसा चालवावा हे तालिबानने कतारकडे (Taliban should learn from Qatar) पाहून शिकून घ्यावं असंही ते म्हणाले.

अब्दुल रहमान अल थानी यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये युरोपियन फॉरेन पॉलिसी प्रमुख जोसेफ बोरेल यांच्यासोबत चर्चा केली. ते म्हणाले, की अफगाणिस्तानमध्ये तालिबान घेत असलेले निर्णय दुर्दैवी आहेत. त्यांनी घेतलेल्या कित्येक निर्णयांमुळे अफगाणिस्तान अधोगतीला (Taliban will take Afghan backwards) जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेख मोहम्मद म्हणाले, “आपल्याला तालिबानशी सातत्याने संपर्क ठेवणं गरजेचं आहे. असं करूनच आपण त्यांना विवादास्पद निर्णय घेण्यापासून परावृत्त करू शकतो. एक इस्लामिक राष्ट्र असूनही कायदा कशाप्रमाणे राबवता येतो आणि महिलांचे प्रश्न (How to deal with women’s issues) कसे सोडवता येतात हे आपण त्यांना दाखवायला हवं.”

CHINA GO BACK! नेपाळची जनता उतरली रस्त्यावर, अतिक्रमणाविरोधात जोरदार आंदोलन

शेख मोहम्मद यांनी या वेळी बोलताना कतारचं उदाहरण दिलं. कतारमध्ये इस्लामिक कायद्यांनुसार शासन चालतं; मात्र वर्क फोर्स किंवा शिक्षणाबाबत महिलांना समान अधिकार (Qatar on Women rights) देण्यात आले आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तालिबानचे काही निर्णय विवादास्पद असले, तरी गेल्या काही वर्षांमध्ये अफगाणिस्तानने केलेली प्रगती तालिबान कायम ठेवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यासोबतच त्यांनी इतर देशांनाही आवाहन केलं आहे, की अफगाणिस्तान सध्या संवेदनशील स्थितीमध्ये आहे. त्यामुळे इतरांनी त्याला वेगळं टाकू नये.

मुलींबरोबर अश्लील चाळे करत होते माजी गव्हर्नर, VIDEO VIRAL होताच पाकिस्तानात खळबळ

तालिबानने सत्तेत येताना महिलांचा शिक्षणाचा अधिकार कायम ठेवणार असल्याची घोषणा केली होती; पण त्या दृष्टीने त्यांनी कोणतीही पावलं उचललेली दिसत नाहीत. तसंच, महिलांच्या हक्कांविरोधात सातत्याने तालिबान विविध फतवे काढताना दिसत आहे. तालिबान आणि अमेरिकेमध्ये चर्चेसाठी (Taliban America discussion) माध्यम म्हणून कतार हा प्रमुख देश आहे. अमेरिकेचा सहकारी देश म्हणूनही कतारकडे पाहिलं जातं. एवढंच नाही, तर कतारमध्ये तालिबानचं राजकीय कार्यालयही उभारण्यात आलं आहे. दरम्यान, तालिबानने अफगाणिस्तानमध्ये स्वतःचं सरकार स्थापन केलं आहे; मात्र जगातल्या इतर कोणत्याही देशाने अद्याप याला अधिकृत मान्यता दिलेली नाही.

First published:

Tags: Afghanistan, Muslim, Taliban