मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

अनेक मुलींबरोबर नको त्या अवस्थेत दिसले माजी गव्हर्नर, VIDEO VIRAL होताच पाकिस्तानात खळबळ

अनेक मुलींबरोबर नको त्या अवस्थेत दिसले माजी गव्हर्नर, VIDEO VIRAL होताच पाकिस्तानात खळबळ

सिंध प्रांताचे माजी राज्यपाल मोहम्मद झुबैर उमर (Muhammad Zubair Umar) यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ (obscene Video) सध्या व्हायरल झाल्यानं पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे.

सिंध प्रांताचे माजी राज्यपाल मोहम्मद झुबैर उमर (Muhammad Zubair Umar) यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ (obscene Video) सध्या व्हायरल झाल्यानं पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे.

सिंध प्रांताचे माजी राज्यपाल मोहम्मद झुबैर उमर (Muhammad Zubair Umar) यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ (obscene Video) सध्या व्हायरल झाल्यानं पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे.

इस्लामाबाद, 3o सप्टेंबर: भारताचा (India) सख्खा शेजारी असलेल्या पाकिस्तानात (Pakistan ex governer obscene video clip viral) सतत राजकीय उलथापालथी होत असतात. लोकशाहीपेक्षा हुकुमशाहीच तिथे अधिक चालते. सध्या तिथे माजी क्रिकेटर इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालच्या तेहरीक-ए-इन्साफ (Tehrik-E-Insaf) पक्षाचं सरकार आहे. इम्रान खान पंतप्रधान (PM Imran Khan) असून, त्यांचं सरकार पाडण्यासाठी विरोधी पक्ष प्रयत्न करत असतात. इम्रान खान यांच्या पक्षाला लक्ष्य करणाऱ्या पीएमएल-एन (PML-N) म्हणजेच पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज पक्षाचे नेते आणि सिंध प्रांताचे माजी राज्यपाल मोहम्मद झुबैर उमर (Muhammad Zubair Umar) यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ (Video) सध्या व्हायरल झाल्यानं पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे. 'झी न्यूज'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

या व्हिडिओमध्ये जुबैर अनेक मुलींसोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसत आहेत. पाकिस्तानी लष्कर, तसंच आयएसआय या गुप्तचर संस्थेशी घनिष्ठ संबंध असणाऱ्या मोहम्मद जुबैर उमर यांनी हा व्हिडिओ खोटा असल्याचा दावा केला असून, हे आपल्याला बदनाम करण्याचं षड्यंत्र असल्याचं म्हटलं आहे. राजकारणाची सर्वांत खालची पातळी असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

मर्यादेपेक्षा जास्त खर्च पडला ‘महाग’, फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांना शिक्षा

हा व्हिडिओ काही महिन्यांपूर्वी कराचीच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बनवण्यात आला होता, अशी चर्चा आहे. यामध्ये दोनपेक्षा जास्त मुली दिसत असून, तो चार कॅमेऱ्यांसह वेगवेगळ्या कोनातून चित्रित करण्यात आला आहे. आतापर्यंत फक्त 1 मिनिट 7 सेकंदांचं फुटेज असलेला व्हिडिओ व्हायरल झाला असून, आणखीही फुटेज बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पीएमएल-एन अर्थात पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज पक्षाच्या नेत्या मरियम नवाज यांच्या सांगण्यावरून हा व्हिडिओ बनवण्यात आला असल्याचीही चर्चा आहे; मात्र मरियम नवाज यांनी संपूर्ण प्रकरणाची सत्यता उजेडात आणल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Trump यांच्यावरील पुस्तकावर टीका,पौरुषत्वाबद्दल थेट सेक्रेटरीशी साधला होता संवाद

नोकरीचं आमिष दाखवून जुबैर मुलींचे लैंगिक शोषण करत असत, असंही म्हटलं जात आहे. सिंधचे राज्यपाल (Sindh Governor) असताना त्यांच्याबद्दल अशा प्रकारच्या बातम्या आल्या होत्या अशीही चर्चा जनतेत सुरू आहे.

या व्हिडिओमुळे जुबैर यांची राजकीय कारकीर्द पणाला लागली आहेच; पण सतत इम्रान खान आणि त्यांच्या पक्षाला लक्ष्य करणाऱ्या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज पक्षालाही फटका बसला आहे. आता या सगळ्या राजकीय घडामोडींमुळे पाकिस्तानातल्या राजकारणाला कोणतं वळण मिळतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

First published:

Tags: Pakistan, Video viral