मराठी बातम्या /बातम्या /विदेश /CHINA GO BACK! नेपाळची जनता उतरली रस्त्यावर, अतिक्रमणाविरोधात जोरदार आंदोलन

CHINA GO BACK! नेपाळची जनता उतरली रस्त्यावर, अतिक्रमणाविरोधात जोरदार आंदोलन

चीनकडून होत असलेल्या अतिक्रमणाविरोधात नेपळी जनता (Nepal People agitates against China’s encroachment in the country) रस्त्यावर उतरली आहे.

चीनकडून होत असलेल्या अतिक्रमणाविरोधात नेपळी जनता (Nepal People agitates against China’s encroachment in the country) रस्त्यावर उतरली आहे.

चीनकडून होत असलेल्या अतिक्रमणाविरोधात नेपळी जनता (Nepal People agitates against China’s encroachment in the country) रस्त्यावर उतरली आहे.

काठमांडू, 30 सप्टेंबर : चीनकडून होत असलेल्या अतिक्रमणाविरोधात नेपळी जनता (Nepal People agitates against China’s encroachment in the country) रस्त्यावर उतरली आहे. चीनने आपल्या विस्तारवादाला आवर घालावा आणि नेपाळच्या जमिनीवर (Nepal citizens announce slogans against china) केलेलं अतिक्रमण परत घ्यावं, अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘चीन हमारी जमीन लौटाओ’ आणि ‘GO BACK CHINA’ अशा घोषणा आंदोलकांनी यावेळी दिल्या.

आंदोलन कशासाठी?

चीनने आपल्या भूमीवर अतिक्रमण केल्याचा नेपाळचा दावा आहे. त्याचप्रमाणं नेपाळच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये चीन ढवळाढवळ करत असल्याचा वारंवार अनुभव येत असल्याचा दावा नेपाळी नागरिकांनी केला आहे. काठमांडूमध्ये लोकतांत्रिक युवा मंचाच्या वतीनं आयोजित आंदोलनात सुमारे 200 नागरिकांनी सहभाग घेत चीनविरोधात नारेबाजी केली.

चीनकडून नेपाळमध्ये बांधकाम

एका रिपोर्टनुसार चीननं नेपाळच्या भूमीवर बांधकाम करायला सुरुवात केली असून आतापर्यंत 12 ते 15 इमारती बांधल्या आहेत. या इमारती आपल्या जागेवर अतिक्रमण करून बांधण्यात आल्या असून त्या तातडीने हटवण्याची मागणी नेपाळी जनतेने केली आहे. या कारणामुळे चिनी आणि नेपाळी नागरिकांमध्ये अनेकदा संघर्ष उफाळून येत असून चिनी नागरिकांना प्रवेश करू न देण्याची भूमिका नेपाळी नागरिकांनी घेतली आहे.

चौकशी समितीची स्थापना

नेपाळचे पंतप्रधान शेख बहादूर थापा यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एका समितीची स्थापना केली आहे. नेपाळच्या हुमला भागात चीनकडून झालेल्या अतिक्रमणाबाबत अब्यास करून ही समिती सरकारला अहवाल देणार आहे. यापूर्वीच्या केपी ओली शर्मा यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं चीनकडून अतिक्रमण झालंच नसल्याचा दावा केला होता. त्या सरकारनेदेखील 19 सदस्यांची समिती नेमली होती. मात्र त्यानंतरही चीनचं आक्रमण सुरुच असून नेपाळी नागरिकांना या भागात राहणं कठीण होत चाललं आहे.

First published:

Tags: Border, China, Nepal