दिल्ली 3 सप्टेंबर : अफगाणिस्तानचे (Afghanistan crisis) माजी पंतप्रधान आणि ‘काबुलचा कसाई’ अशी ओळख असलेल्या गुलबुद्दीन हिकमतयार (Gulbuddin Hekmatyar) यांनी जुन्या सरकारला साथ देणाऱ्यांना भारताने (India) शरण देऊ नये, अशी थेट धमकीच दिली आहे. तालिबानने (Taliban) आज अफगाणिस्तानात सत्ता स्थापन केली आहे त्याच पार्श्वभूमीवर या ‘काबुलाच्या कसाया’ने भारताविरोधात गरळ ओकली आहे. त्यामुळे आता भारताकडून याला काय उत्तर मिळतं हे ही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. भारताने शरणार्थींना शरण देऊन चूक करू नये, नाही तर तालिबान याचा बदला घेईल असंही त्यांनी म्हटलंय. कारण या शरणार्थांद्वारे अफगाणिस्तान सरकारविरोधात षडयंत्र केले जाण्याची भीती हिकमतयार यांनी व्यक्त केली आहे. आता तालिबानच्या या वक्तव्याचा पाकिस्तान फायदा घेण्याचा प्रयत्न करणार आहे. हिकमतयार यांनी काश्मीर मुद्द्यावरही आपले मत मांडताना म्हटलंय की तालिबानला काश्मीरप्रश्नात काडीमात्र रस नाहीये. आम्ही अफगाणिस्तानचा कोणत्याही विदेशी धर्तीवरील हल्यासाठी उपयोग होऊ देणार नाही. भारताला याबाबत शंका असायला नको.
Explainer: तालिबानचा कथित म्होरक्या हिबातुल्लाह अखुंदजादा आहे तरी कुठे? ठावठिकाणा गुप्त ठेवण्याचं हे आहे कारणगुलबुद्दीन हिकमतयार हे नेहमी कुठल्या न कुठल्या वादात अडकतात. ते सातत्याने वादग्रस्त वक्तव्य असल्याने त्याचा परिणाम अफगाणिस्तानच्या परराष्ट्र नितीवर होत आला आहे. काही लोक त्यांना पाकिस्तानचे समर्थक मानतात. त्यामुळे आगामी काळात भारतासाठी अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

)







