मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

दोन-तृतीयांश अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा; सत्तेत वाटा देण्याचा सरकारचा प्रस्ताव

दोन-तृतीयांश अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा; सत्तेत वाटा देण्याचा सरकारचा प्रस्ताव

तालिबानी बंडखोर (Talibani Insurgents) हिंसा थांबवणार असतील, तर त्यांना सत्तेत वाटा दिला जाईल, असा प्रस्ताव अफगाणिस्तान सरकारने त्यांच्यासमोर ठेवल्याचं वृत्त सूत्रांच्या हवाल्याने देण्यात येतंय.

तालिबानी बंडखोर (Talibani Insurgents) हिंसा थांबवणार असतील, तर त्यांना सत्तेत वाटा दिला जाईल, असा प्रस्ताव अफगाणिस्तान सरकारने त्यांच्यासमोर ठेवल्याचं वृत्त सूत्रांच्या हवाल्याने देण्यात येतंय.

तालिबानी बंडखोर (Talibani Insurgents) हिंसा थांबवणार असतील, तर त्यांना सत्तेत वाटा दिला जाईल, असा प्रस्ताव अफगाणिस्तान सरकारने त्यांच्यासमोर ठेवल्याचं वृत्त सूत्रांच्या हवाल्याने देण्यात येतंय.

काबूल, 12 ऑगस्ट : तालिबानी बंडखोरांनी अफगाणिस्तानातल्या (Afghanistan Crisis) गझनी (Ghazni) शहरावर गुरुवारी (12 ऑगस्ट) कब्जा मिळवला. त्यामुळे गेल्या एका आठवड्याभारत त्यांनी कब्जा केलेल्या प्रांतांच्या राजधान्यांची संख्या नऊ एवढी झाली आहे. या पार्श्वभूमीवर, तालिबानी बंडखोर (Talibani Insurgents) हिंसा थांबवणार असतील, तर त्यांना सत्तेत वाटा दिला जाईल, असा प्रस्ताव अफगाणिस्तान सरकारने त्यांच्यासमोर ठेवला असल्याचं वृत्त तिथल्या स्थानिक माध्यमांनी दिलं आहे.

तालिबानी संघटनेच्या बंडखोरांनी अफगाणिस्तानमधल्या एकामागून एक शहरांवर ताबा मिळवण्याचा झपाटा लावला आहे. अफगाणिस्तानचा दोन-तृतीयांश भाग सध्या तालिबानच्या ताब्यात गेला आहे. त्यामुळे सरकारचं देशावरचं नियंत्रण सुटत चाललं आहे. त्यामुळे तालिबान्यांना सत्तेतला वाटा देण्याचा प्रस्ताव सरकारने ठेवला आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी अल जझीरा या वृत्तवाहिनीला दिली.

अफगाणिस्तानने मध्यस्थ म्हणून कतारकडे (Qatar) प्रस्ताव पाठवला असून, तालिबान्यांनी अफगाणिस्तानात चालवलेला हिंसाचार थांबवला, तर त्यांना देशाच्या सत्तेत वाटा देण्यात येईल, असं त्या प्रस्तावात म्हटल्याचं वृत्त सूत्रांच्या हवाल्याने 'एएफपी' या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्याच्या फौजा मागे बोलावण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी घेतला होता. त्यानंतर तालिबान्यांनी देशात हिंसाचाराला (Violence) सुरुवात करून एकेक भाग काबीज करायला सुरुवात केली. त्यामुळे बायडेन यांच्या निर्णयावर टीका केली जात आहे. दरम्यान, जो बायडेन यांनी मात्र आपलं सैन्य माघारी बोलावण्याच्या आपल्या निर्णयाचा अजिबात पश्चात्ताप होत नसल्याचं मंगळवारी (10 ऑगस्ट) सांगितलं. तसंच, आपल्या देशासाठी लढण्याचं आवाहन त्यांनी अफगाणी नेत्यांना केलं आहे.

अफगाणिस्तानात तरुणींचं तालिबानी का करताहेत अपहरण;कारण वाचून सरकेल पायाखालची जमीन

अमेरिकेच्या नेतृत्वाखालच्या आंतरराष्ट्रीय सैनिकांच्या फौजांपैकी शेवटच्या फौजा अफगाणिस्तानातून या महिन्याच्या अखेरीला बाहेर पडण्यासाठी सज्ज आहेत. या पार्श्वभूमीवर, तालिबान्यांनी चहूबाजूंनी युद्ध छेडलं आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रांतांतल्या हजारो नागरिकांनी काबूल आणि अन्य शहरांमध्ये सुरक्षित आसरा मिळेल या आशेने आपली घरं सोडण्यास सुरुवात केली आहे.

राजधानी काबूल (Kabul) आणि कंदाहार (Kandahar) हे महत्त्वाचं शहर यांना जोडणाऱ्या महामार्गावर गझनी हे शहर वसलेलं आहे. प्रचंड धुमश्चक्रीनंतर त्या शहरावर तालिबान्यांनी कब्जा केला असून, सर्व सरकारी यंत्रणांच्या तिथल्या मुख्यालयांवरही त्यांनी ताबा मिळवला आहे, अशी माहिती एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने दिली.

देशाच्या दक्षिणेकडचं महत्त्वाचं शहर असलेल्या कंदाहारमध्येही अफगाणी सैन्य आणि तालिबानी बंडखोरांमध्ये लढाई झाली. तिथल्या हॉस्पिटलमध्ये कित्येक अफगाणी सैनिकांचे मृतदेह आणण्यात आले असून, काही जखमी तालिबानीही तिथे आले असल्याची माहिती बुधवारी (11 ऑगस्ट) सायंकाळी उशिरा तिथल्या एका डॉक्टरनी दिली.

कंदाहारमधल्या प्रांतिक तुरुंगावर आपण ताबा मिळवल्याचं तालिबानकडून जाहीर करण्यात आलं. उत्तरेकडच्या कुंडुझ आणि शेबेरघन, तसंच, पश्चिमेकडच्या फराह या शहरांबाहेरच्या विमानतळांवरही (Airports) आपण कब्जा केल्याचं तालिबानकडून सांगण्यात आलं. आधीच अडचणीत सापडलेल्या अफगाणी सैन्याला रसद पुरवणं त्यामुळे अधिकच अवघड होऊन बसलं आहे.

मूळच्या पुण्याच्या IPS ऑफिसरनी मृत्यूशीही दिली यशस्वी झुंज; आसाम-मिझोराम संघर्षात झेलाव्या लागल्या होत्या गोळ्या

हेल्मंड (Helmond) या दक्षिणेतल्या प्रांताची राजधानी असलेल्या लष्कर गाहमधल्या मुख्यालयावरही आपला ताबा असल्याचं तालिबानने जाहीर केलं आहे. हा भाग बंडखोरांच्या कारवायांसाठी आधीपासूनच प्रसिद्ध आहे.

पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या कंदाहार आणि दक्षिण व पूर्वेतल्या अन्य प्रांतांमध्ये तालिबानची शक्ती पूर्वीपासूनच जास्त आहे; मात्र गेल्या काही आठवड्यांत उत्तरेकडच्या भागांतही तालिबान्यांनी मोठ्या प्रमाणावर घुसखोरी करून वर्चस्व प्राप्त केलं आहे.

बुधवारी (11 ऑगस्ट) अमेरिकेच्या संरक्षणविषयक एका अधिकाऱ्याने अमेरिकी गुप्तचर यंत्रणेच्या (US Intelligence Report) अहवालाचा दाखला देऊन सांगितलं, की तालिबानी कारवायांचा वेग पाहता येत्या 30 दिवसांत ते काबूल शहराला वेगळं पाडू शकतात आणि 90 दिवसांत त्यावर कब्जा करू शकतात.

इस्रायलवर चीनचा Cyber Attack : गोपनीय माहिती चोरली, संशय इराणकडे वळवण्याचा प्रयत

सर्व बाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या एका पठारावर काबूल शहर वसलेलं आहे. संरक्षण क्षेत्रातल्या एका पाश्चिमात्य सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, काबूल शहराकडे येणारे सगळे मार्ग नागरिकांच्या गर्दीने व्यापून गेले आहेत. तालिबान्यांच्या हिंसाचारामुळे राजधानी काबूलमध्ये आश्रय घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची ही गर्दी आहे; मात्र त्यात तालिबानी बंडखोरही असण्याची भीती आहे, असंही त्या सूत्राने सांगितलं.

1996 ते 2001 या कालावधीत बहुतांश अफगाणिस्तान तालिबानच्या नियंत्रणाखाली होतं. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि अल कैदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेन याला आसरा दिल्याच्या कारणावरून तालिबानकडून सत्ता काढून घेण्यात आली होती. म्हणूनच अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या अफगाणिस्तानच्या सरकारचा पाडाव करून तिथे पुन्हा कडक इस्लामिक कायदा लागू करण्याचा तालिबानचा मानस आहे.

First published:

Tags: Afghanistan, Taliban