मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /इस्रायलवर चीनचा Cyber Attack : गोपनीय माहिती चोरली, संशय इराणकडे वळवण्याचा प्रयत्न

इस्रायलवर चीनचा Cyber Attack : गोपनीय माहिती चोरली, संशय इराणकडे वळवण्याचा प्रयत्न

फोनमध्ये TeamViewer QuickSupport, Microsoft Remote desktop, AnyDesk Remote Control, AirDroid: Remote access and File, AirMirror: Remote support and Remote control devices, Chrome Remote Desktop, Splashtop Personal- Remote Desktop हे app कधीही डाउनलोड करू नका.

फोनमध्ये TeamViewer QuickSupport, Microsoft Remote desktop, AnyDesk Remote Control, AirDroid: Remote access and File, AirMirror: Remote support and Remote control devices, Chrome Remote Desktop, Splashtop Personal- Remote Desktop हे app कधीही डाउनलोड करू नका.

चीनकडून (China) इस्त्रायलवर (Israel) आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला (cyber attack) करण्यात आला आहे.

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट : चीनकडून (China) इस्रायलवर (Israel) आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला (cyber attack) करण्यात आला आहे. हॅकर्सनी सरकारी संस्था (Government organizations), माहिती तंत्रज्ञान कंपन्या (IT companies) आणि टेलिकॉम सेक्टरमधील (Telecom sector) महत्त्वाच्या डेटाची चोरी केली आहे. अमेरिकी सायबर सिक्युरीटी कंपनी ‘फर्स्ट आय’नं या हल्ल्यामागे चीनचा हात असल्याचा दावा केला आहे. चीनच्या चोरलेल्या डेटामध्ये सर्वसामान्य युजर्सचा अत्यंत महत्त्वाचा आणि गोपनीय तपशीलही चोरला गेला आहे.

चीनचा सायबर ग्रुप UNC215 कडून हा हल्ला करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मायक्रोसॉफ्ट शेअरपॉइंटच्या जुन्या त्रुटींना निशाणा बनवत हॅकर्सनी इस्त्रायच्या सिस्टिमवर ताबा मिळवला आणि संवेदनशील डेटाची चोरी केली. विशेष म्हणजे या हल्ल्याचा संशय़ इराणवर जाईल, यासाठीदेखील चिनी हॅकर्सनी एक योजना आखली होती.

अशी होती योजना

यापूर्वी अनेकदा इराणच्या हॅकर्सकडून इस्रायलवर सायबर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. इराण आणि इस्रायल हे जुने प्रतिस्पर्धी असून एकमेकांना खिंडीत गाठण्याचा ते नेहमीच प्रयत्न करत असतात. या हल्ल्याचा संशयदेखील इराणवर जावा, यासाठी हॅकर्सनी फारसी भाषेचा उपयोग केला. या हल्ल्याची चौकशी करताना इस्रायलच्या ही गोष्ट लक्षात येईल आणि त्यामुळे त्यांचा संशय इराणवर जाईल, अशी ही योजना होती. मात्र प्रत्यक्षात ही योजना फ्लॉप झाली आणि अमेरिकेच्या सायबर सिक्युरिटी कंपनीनकडून चीनची चोरी उघड झाली.

हे वाचा -ऑनर किलिंग : वडिलांनी पकडले हात, काका आणि भावाने चढवले फासावर

सायबर हल्ल्यांचा इतिहास

चीनच्या UNC215 या ग्रुपकडून यापूर्वीही अऩेकदा वेगवेगळ्या देशांवर सायबर हल्ले करण्यात आले आहेत. मध्य आशिया, युरोप, अमेरिका आणि आशियातील अनेक देशांच्या सायबर सिक्युरीटीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न या ग्रुपने केला आहे. आशिया खंडात आपला दबदबा निर्माण करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे चीनला झुकवण्याची मिळेल ती संधी अमेरिकेकडून शोधली जात आहे. इस्रायल हा अमेरिकाधार्जिणा देश असल्यामुळेच काही गोपनीय माहिती चोरण्याचा प्रयत्न चीनने केला असावा, असं जाणकारांचं म्हणणं आहे.

First published:

Tags: China, Cyber crime, Israel