जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / सैन्याचं तालिबानसमोर लोटांगण; अफगाणिस्तानातील सर्वात मोठ्या चौथ्या शहरावरही बंडखोरांचा ताबा

सैन्याचं तालिबानसमोर लोटांगण; अफगाणिस्तानातील सर्वात मोठ्या चौथ्या शहरावरही बंडखोरांचा ताबा

तालिबानी बंडखोर राजधानी काबूलमध्येही दाखल झाले आहेत.

तालिबानी बंडखोर राजधानी काबूलमध्येही दाखल झाले आहेत.

Afghan Troops-Taliban War: तालिबानच्या वाढत्या नियंत्रणामुळे अफगाणिस्तानातील परिस्थिती बिकट बनत चालली आहे. तालिबान शहरापाठोपाठ शहरं काबीज करत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

काबूल, 15 ऑगस्ट: अमेरिकेनं आपलं सैन्य माघारी (American Army Went Back) घेतल्यापासून अफगाणिस्तानात तालिबानी (Taliban) संघटनेच्या हिंसक घटना वाढल्या आहेत. तालिबानच्या वाढत्या नियंत्रणामुळे अफगाणिस्तानातील परिस्थिती बिकट बनत चालली आहे. तालिबान शहरापाठोपाठ शहरं काबीज करत आहे. यानंतर आता तालिबाननं बल्ख प्रांताची राजधानी मजार-ए-शरीफ (Mazar-i-Sharif) शहर काबीज केलं आहे. अफगाणिस्तानच्या खासदारानं याबाबतची माहिती दिली आहे. खासदार म्हणाले की, तालिबान बंडखोरांनी चहुबाजूंनी हल्ला करत अफगाणिस्तानमधील सर्वात मोठं चौथ्या क्रमांकाचं शहर मजार-ए-शरीफ ताब्यात घेतलं आहे. बल्खचे खासदार आबास इब्राहिमजादा म्हणाले की, बल्ख प्रांताच्या राष्ट्रीय लष्करानं आधी आत्मसमर्पण केलं, त्यानंतर अफगान सरकारला समर्थन देणाऱ्या सैन्यांचं मनोबल खचलं त्यामुळे त्यांनीही आत्मसमर्पण केलं आहे. हेही वाचा- ‘आठवडाभरात काबूलसह संपूर्ण अफगाणिस्तानवर करणार कब्जा’; तालिबानींचा दावा खासदारांनी पुढे सांगितलं की, तालिबाननं बल्ख प्रांतातील सर्व इमारती, विशेषत: राजभवन आपल्या ताब्यात घेतलं आहे. यानंतर आता तालिबानी बंडखोर अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या जवळ पोहोचले आहेत. त्याचबरोबर तालिबान्यांनी उत्तर फरयाब प्रांताची राजधानी मैमाना वरही ताबा मिळवला आहे. याबाबत माहिती देताना उत्तर फरयाब प्रांताच्या खासदार फौजिया रौफी यांनी सांगितलं की, तालिबान बंडखोरांनी मैमाना शहराला जवळपास महिनाभर वेढा दिला होता. त्यानंतर अलीकडेच तालिबानी बंडखोर शहरात दाखल झाले. यावेळी सुरक्षा दलांनी तालिबान्यांचा प्रतिकार केला पण शेवटी शनिवारी त्यांना आत्मसमर्पण करावं लागलं आहे. हेही वाचा- ‘पुरुष बरोबर नसेल तर बाजारात जायचं नाही, सँडल नाहीत’; तालिबानी राजवटीत नवी बंधनं तालिबाननं अफगाणिस्तानचा बहुतांश भाग केला काबीज अफगाणिस्तानातून अमेरिकेचं सैन्य माघारी जात नाही, तोपर्यंतच तालिबाननं उत्तर, पश्चिम आणि दक्षिण अफगाणिस्तानचा बराचसा भाग आपल्या ताब्यात घेतला होता. त्यानंतर तालिबाननं आपल्या हिंसक कारवाया करत अफगाणिस्तानातील अनेक महत्त्वपूर्ण महामार्ग आणि शहरं आपल्या ताब्यात घेतली आहे. यानंतर जवळपास 4 लाखहून अधिक नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. शिवाय काही शहरांवर नियंत्रण मिळवताच तालिबाननं आपल्या कायद्यांच्या अंमलबजावणी करायला सुरुवात केली आहे. महिलांवर विविध प्रकारचे निर्बंध लादण्यात येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात