मराठी बातम्या /बातम्या /विदेश /अजब चोराची गजब कहाणी! ना पैसे, ना दागिने; थेट नदीवरचा पूलच नेला चोरून

अजब चोराची गजब कहाणी! ना पैसे, ना दागिने; थेट नदीवरचा पूलच नेला चोरून

चोरट्याने अशा एका वस्तूवर डल्ला मारला, ज्याची कल्पनाही कुणी करू शकणार नाही. त्यामुळे सर्वांच्या डोळ्यांदेखत तो चोरी करू शकला.

चोरट्याने अशा एका वस्तूवर डल्ला मारला, ज्याची कल्पनाही कुणी करू शकणार नाही. त्यामुळे सर्वांच्या डोळ्यांदेखत तो चोरी करू शकला.

चोरट्याने अशा एका वस्तूवर डल्ला मारला, ज्याची कल्पनाही कुणी करू शकणार नाही. त्यामुळे सर्वांच्या डोळ्यांदेखत तो चोरी करू शकला.

ओहियो, 21 जानेवारी: अमेरिकेतील (America) ओहियो (Ohaio) शहरात एका चोरट्याने (Thief) नदीवर बांधलेला अख्खाच्या अख्खा पूलच (Bridge on river) चोरून नेल्याची (Stolen) घटना समोर आली आहे. चोरीच्या अनेक गोष्टी आणि किस्से आजवर तुम्ही ऐकले असतील. त्यात कुणी पैसे चोरतो, कुणी दागिने चोरतो तर कुणी मौल्यवान वस्तू पळवून नेतो. मात्र काही चोऱ्या अशा असतात ज्यांची कुणी कधी कल्पनाही केलेली नसते. अशी अकल्पनीय चोरी अमेरिकेतील ओहियोमध्ये राहणाऱ्या एका चोरट्यानं केली आहे.

पूलावरच मारला डल्ला

ओहियो शहरात राहणाऱ्या 63 वर्षांच्या एका अट्टल चोराने नदीवर बांधलेल्या एका पुलावरच हात साफ केला. या चोरट्याने त्यासाठी एका क्रेनचा उपयोग केला. ही क्रेन पुरवणाऱ्या कंपनीला रितसर पैसे देऊन त्याने भाड्याने बोलावलं होतं. पूलाचे एक एक भाग तो चोरत गेला आणि काही दिवसांत नदीवर बांधलेला अख्खाच्या अख्खा पूलच या पठ्ठ्याने गायब करून टाकला.

अशी केली चोरी

अनेकांना हा प्रश्न पडेल की दिवसाढवळ्या, सर्वांच्या डोळ्यांदेखत अशी कशी पुलाची चोरी होऊ शकते. मात्र चोराने नागरिकांच्या मानसिकतेचा असा काही फायदा घेतला की कुणालाही त्याच्यावर संशय आला नाही. जेव्हा एखादा चोर चोरी करण्यासाठी येतो, तेव्हा त्याच्या देहबोलीतून आणि त्यानंतर कृतीतून तो चोरी करणार असल्याचं दिसून येतं. मात्र जेव्हा हा चोरटा भाडोत्रा क्रेन घेऊन पुलापाशी आला आणि त्याने पुलाचा एक एक भाग तोडायला सुरुवात केली, त्यावेळी हे काहीतरी सरकारी काम सुरू आहे, असाच सर्वांचा समज झाला. ही चोरी सुरू असेल, याची काही कुणाला कल्पना आली नाही.

पूल केला बंद

पुलाचा एकेक भाग रोज गायब होत असताना आणि एका क्रेनच्या मदतीनं पूल तोडला जात असताना येणाजाणारे नागरिक त्याकडे पाहतही होते. मात्र कदाचित पुलाचं नूतनीकरण सुरू असेल किंवा त्यात काही बिघाड झाल्यामुळे दुरुस्तीचं काम सुरु असेल, असं वाटल्यामुळे सर्वांनीच त्याकडे दुर्लक्ष केलं. अखेर अनेक दिवस पूल गायब झाल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेत तपास सुरू केला.

हे वाचा- ूपघाना: खाणीसाठी स्फोटके घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये स्फोट,17 जणांचा मृत्यू तर 59 जखमी

पूल सापडला

पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर हा पूल त्यांना सापडला असून चोरट्यालाही त्यांनी अटक केली आहे. पुलाचे वेगवेगळे भाग करून त्याने एका बंद गोदामासारख्या भागात ठेऊन दिले होते. त्याची काळ्या बाजारात विक्री करून पैसे कमावण्याचा त्याचा डाव होता. मात्र हा व्यवहार होण्यापूर्वीच पोलिसांनी चोरट्याचा मुस्क्या आवळल्या आहेत. या अजब चोरीची सध्या अमेरिकेत जोरदार चर्चा आहे.

First published:

Tags: America, Crime, Police, Thief