Home /News /videsh /

Ghana Explosion: सोन्याच्या खाणीसाठी स्फोटके घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये भीषण स्फोट, 17 जणांचा मृत्यू तर 59 जखमी

Ghana Explosion: सोन्याच्या खाणीसाठी स्फोटके घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये भीषण स्फोट, 17 जणांचा मृत्यू तर 59 जखमी

पश्चिम घानामध्ये (Ghana Explosion) सोन्याच्या खाणीसाठी (gold mine Blast) स्फोटके घेऊन जाणाऱ्या ट्रकला दुचाकीने धडक दिल्याने अपघात झाला. यावेळी ट्रकमधील स्फोटकांनी पेट घेतल्याने झालेल्या जोरदार स्फोटामुळे सुमारे 17 जणांचा मृत्यू झाला असून 59 जण जखमी झाले आहेत

पुढे वाचा ...
आक्रा, 21 जानेवारी: पश्चिम घानामध्ये (Ghana Explosion) सोन्याच्या खाणीसाठी (gold mine Blast) स्फोटके घेऊन जाणाऱ्या ट्रकला दुचाकीने धडक दिल्याने अपघात झाला. यावेळी ट्रकमधील स्फोटकांनी पेट घेतल्याने झालेल्या जोरदार स्फोटामुळे सुमारे 17 जणांचा मृत्यू झाला असून 59 जण जखमी झाले आहेत. मृतांचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. स्फोटामुळे पश्चिम घानामधील (Western Ghana) अपिएटे (Apiate) हे छोटे शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं सांगण्यात येत आहे. परिसरात काम करणाऱ्या आणि स्फोटाचा आवाज ऐकणाऱ्या लोकांनी मीडियाला सांगितलं की, 'स्फोटामुळे बऱ्याच इमारती कोसळल्या असून, त्याच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक आणि प्राणी अडकले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेतील बहुतेक जखमींना वाचवण्यात आले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी आपत्कालीन सेवा देणारे कर्मचारी सक्रिय झाले आहेत. लोकांना शांतता राखण्याचे आवाहन सातत्याने करण्यात येत आहे. तसेच पोलिसांनी घाना राष्ट्रीय अग्निशमन सेवा (NADMO) आणि रुग्णवाहिका सेवेसह (Ambulance Service) आरोग्य कर्मचाऱ्यांना परिस्थिती हाताळण्याचे आदेश दिले आहेत. लोकांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी जवळच्या शहरात जाण्याचा सल्ला दिला गेलाय. अपिएटेची लोकसंख्या सुमारे 10 हजार आहे. येथील बहुतांश लोक शेतकरी आणि खाण कामगार आहेत. हे वाचा-भ्रष्टाचाराचा विरोध केल्याबद्दल चँपियन बॉक्सरला मृत्यूदंड प्रत्यक्षदर्शींनी सांगितला अपघाताचा घटनाक्रम दुसरीकडे, प्रत्यक्षदर्शींनी स्थानिक अधिकाऱ्यांना सांगितले की, अपघातानंतर दुचाकीला आग लागल्यानंतर चालक खाली उतरला, आणि त्याने लोकांना पळून जाण्याचा इशारा केला. सुमारे 10 मिनिटांनंतर स्फोटकांनी भरलेल्या ट्रकमध्ये स्फोट झाला. या दुर्घटनेत ज्यांना जीव गमवावा लागला, त्यामध्ये घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. स्फोटकांनी भरलेला ट्रक चिरानो सोन्याच्या खाणीकडे जात होता. तेथून घटनास्थळ हे 140 किलोमीटर दूर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकमध्ये भरलेली स्फोटके चिरानो गोल्ड माईन्सद्वारे चालविल्या जाणाऱ्या जवळच्या खाणीत नेली जात होती. अध्यक्षांनी व्यक्त केला शोक घानाचे राष्ट्राध्यक्ष नाना अड्डो डंकवा अकुफो-अड्डो (Nana Addo Dankwa Akufo-Addo) यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. 'पश्चिम भागातील बोगोसोजवळ स्फोट झाला. ही खरोखरच दुर्दैवी आणि दुःखद घटना आहे. सरकारच्या वतीने, मी मृतांच्या कुटुंबियांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो, आणि जखमी लोक लवकरात लवकर बरे होवो अशी कामना करतो,' असे त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. हे वाचा-समुद्रात बुडतंय ऐतिहासिक जकार्ता, इंडोनेशियानं शोधली दुसरी राजधानी दरम्यान, अलीकडच्या वर्षांत घानामधील गॅस स्फोटांमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. 2015 मध्ये राजधानी आक्रामध्ये 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. मुसळधार पावसामुळे शेकडो लोक गॅस स्टेशनजवळ थांबले असताना हा स्फोट झाला. याच महिन्यात देशातील अशांत भागात आगीच्या घटनेत अनेकांना जीव गमवावा लागला.
First published:

पुढील बातम्या