जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / 9/11 च्या दिवशीचा शपथविधी सोहळा अखेर रद्द, तालिबाननं घेतला मोठा निर्णय

9/11 च्या दिवशीचा शपथविधी सोहळा अखेर रद्द, तालिबाननं घेतला मोठा निर्णय

9/11 च्या दिवशीचा शपथविधी सोहळा अखेर रद्द, तालिबाननं घेतला मोठा निर्णय

पंजशीरवर कब्जा केल्यानंतर संपूर्ण अफगाणिस्तानावर (Afghanistan)आता तालिबानचं (Taliban) राज्य आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

काबूल, 11 सप्टेंबर: पंजशीरवर कब्जा केल्यानंतर संपूर्ण अफगाणिस्तानावर (Afghanistan)आता तालिबानचं (Taliban) राज्य आहे. त्यानंतर तालिबाननं अफगाणिस्तानात नवीन सरकार स्थापन करण्याची घोषणा केली. अमेरिकेच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी तालिबाननं आज नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तयारी केली होती. कारण आज अमेरिकेवर झालेल्या हल्ल्याला (9/11 attack) 20 वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र आता तालिबानने आपला विचार बदलला आहे. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, 9/11 ला हल्ल्याला 20 वर्ष पूर्ण होत असल्यानं तालिबाननं अफगाणिस्तान सरकारचा शपथविधी सोहळा रद्द केला आहे. तालिबान सध्या जगासमोरची आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत तालिबानला अशी कोणतीही काम करण्याची इच्छा नाही ज्यामुळे जगासमोर त्याची प्रतिमा मलिन होईल. तालिबानमुळे भारताच्या डोक्याला त्रास…राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली चिंता रशियाच्या TASS वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, तालिबानने मित्रपक्षांच्या दबावानंतर अफगाणिस्तानात नव्याने स्थापन झालेल्या अंतरिम सरकारचा शपथविधी सोहळा रद्द केला आहे. अफगाणिस्तान सरकारच्या सांस्कृतिक आयोगाचे सदस्य इनामूल्ला सामंगानी यांनी शपथविधी सोहळा रद्द झाल्याची माहिती दिली आहे. यापूर्वी असे वृत्त आलं होतं की अमेरिकेतील 9/11 च्या हल्ल्याला 20 वर्ष पूर्ण होणाऱ्या दिवशी तालिबानचं अंतरिम सरकार शपथविधी सोहळ्या आयोजित करु शकते. सध्या तालिबान काबूलमध्ये सरकार स्थापनेसाठी मोठा सोहळा आयोजित करण्याची तयारी करत आहे. तालिबानने समारंभात सहभागी होण्यासाठी चीन आणि पाकिस्तानसह सहा देशांना आमंत्रणे पाठवली आहेत. तालिबाननं पाठवलेल्या निमंत्रणात तुर्की, कतार, रशिया आणि इराणचा या देशाचाही समावेश आहे. हे सर्व देश तालिबानला सतत पाठिंबा देत आहेत. यापैकी कतार वगळता इतर सर्व देशांचे संबंध अमेरिकेबरोबर चांगले नाहीत. आता सरकार स्थापन होत असताना तालिबाननंही त्यांना निमंत्रण पाठवलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात