नवी दिल्ली, 11 सप्टेंबर: तालिबाननं (Taliban) अफगाणिस्तानावर (Afghanistan) कब्जा मिळवल्यानंतर परिस्थिती गंभीर आहे. याचे पडसाद जगभर उमटताना दिसत आहे. त्यातच याचे पडसाद भारतावरही उमटण्याची शक्यता आहे. आता तालिबानचा (Taliban) उदय हा भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत चिंतेचा विषय बनला आहे. तालिबानच्या मदतीनं अफगाणिस्तानमध्ये बेस बनवून काही अन्य दहशतवादी संघटना (Terrorist Organization) शांततेसाठी धोकादायक ठरू शकतात.
तालिबानवर संरक्षणमंत्र्यांची प्रतिक्रिया
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी असंही म्हटलं आहे की, अफगाणिस्तानचा वापर इतर कोणत्याही देशावर हल्ला करण्यासाठी किंवा कोणालाही धमकवण्यासाठी केला जाऊ शकतो.
तालिबान हा जम्मू -काश्मीरमधील शांततेसाठी धोकादायक
तालिबानची वाढती शक्ती जम्मू -काश्मीरमधील परिस्थितीसाठी धोका बनू शकते अशी भीती भारतीय शिष्टमंडळाने व्यक्त केली आहे. अफगाणिस्तानातून उद्भवलेल्या तालिबानी दहशतीचा धोका येथे पोहोचण्याची शक्यता आहे.
''तरुण आत्महत्या करतोय'', Facebookच्या आयर्लंड ऑफिसमधून थेट दिल्लीत फोन
वाढू शकतात 9/11 सारखे हल्ले
दरम्यान, ब्रिटनची गुप्तचर संस्था MI-5 चे प्रमुख केन मॅकलम म्हणाले की, अफगाणिस्तानात तालिबाननं कब्जा मिळवल्यानंतर पुन्हा 9/11 सारखा हल्ला होऊ शकतो. अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्जामुळे दहशतवाद्यांचे मनोबल वाढेल आणि याचा अर्थ 9/11 सारख्या दहशतवादी हल्ल्यांची भीती कायम आहे.
25 भारतीय IS समर्थक अफगाणिस्तानातून देशाच्या वेशीवर
अफगाणिस्तानात ( Afghanistan) तालिबानी (Taliban Government) सरकार आल्यानंतर संपूर्ण जगभरातील समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यातच आता समोर आलेल्या माहितीनुसार, गुप्तचर अधिकाऱ्यांना याबाबतची दाट शक्यता आहे की, इस्लामिक स्टेटशी (Islamic State) निष्ठा आणि समर्थक असा 25 भारतीयांचा एक गट अफगाणिस्तानातून भारतात येत आहे. गेल्या महिन्यात अफगाणिस्तान ताब्यात आल्यानंतर तालिबाननं विविध तुरुंग तोडून टाकले. यानंतर असे म्हटले जात आहे की हे भारतीय देशात येतील. त्यामुळे आता भारतासाठी मोठा धोका मानलं जात आहे.
आदित्यनाथांना शह देण्यासाठी काँग्रेस सज्ज, प्रियांकांचा प्लान '12हजार KM'
हे सर्व 25 भारतीय राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) दहशतवादी गट IS शी संबंध असल्याच्या यादीत आहेत. NIAच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांना या भारतीयांच्या सद्यस्थितीबाबत काही माहिती नाही. परंतु तपासात असे दिसून आले आहे की हे सर्व अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतात आयएसमध्ये सामील झाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, India, Rajnath singh, Taliban