मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

काबुलमध्ये पुन्हा बॉम्बस्फोट; घटनेत 8 जणांचा मृत्यू, IS ने घेतली हल्ल्याची जबाबदारी

काबुलमध्ये पुन्हा बॉम्बस्फोट; घटनेत 8 जणांचा मृत्यू, IS ने घेतली हल्ल्याची जबाबदारी

इस्लामिक स्टेट (IS) या दहशतवादी गटाने शुक्रवारी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील शिया निवासी भागात झालेल्या प्राणघातक स्फोटाची जबाबदारी स्वीकारली.

  • Published by:  Kiran Pharate

काबूल 06 ऑगस्ट : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील एका मशिदीजवळ शुक्रवारी एका कारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात किमान आठ जण ठार तर 18 जण जखमी झाले. तालिबानच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. काबूलच्या पोलीस प्रमुखाचे तालिबान-नियुक्त प्रवक्ते खालिद झदरान यांच्या म्हणण्यानुसार, पश्चिम काबुलमधील शियाबहुल सार-ए कारेझ भागात बॉम्बस्फोट झाला. सुरुवातीच्या अहवालात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली होती, मात्र नंतर काही जखमींचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा वाढला.

तैवानसाठी सोडलं अन् जपानमध्ये पोहोचलं; China-Taiwan मिसाइल्स हल्ल्यातील विचित्र घटना

इस्लामिक स्टेट (IS) या दहशतवादी गटाने शुक्रवारी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील शिया निवासी भागात झालेल्या प्राणघातक स्फोटाची जबाबदारी स्वीकारली. या दहशतवादी गटाने एका निवेदनात म्हटलं आहे की, पश्चिम काबूलमध्ये केलेल्या हल्ल्यात 20 लोक ठार झाले आणि अनेक जखमी झाले. स्फोटाच्या ठिकाणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतं की स्फोटानंतर जखमी मदतीसाठी इकडे तिकडे धावत आहेत. कट्टरपंथी दहशतवादी गटाने अल्पसंख्याक शिया समुदायावर हल्ला केल्याचा दावा केला आहे. 2014 पासून अफगाणिस्तानमध्ये कार्यरत असलेला IS ला देशासमोरील सर्वात गंभीर सुरक्षा आव्हान म्हणून पाहिले जात आहे.

Nancy Pelosi तैवानमध्ये उतरताच चीननं थयथयाट का केला? 23 वर्षांचा इतिहास आहे कारण

अफगाणिस्तानसाठीचे चीनचे विशेष दूत यू झियाओंग यांनी या आठवड्यात भारताला भेट दिली. यादरम्यान त्यांनी युद्धग्रस्त देशात शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्याच्या पद्धतींवर वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्याशी चर्चा केली. या घडामोडींबद्दल माहिती असलेल्या लोकांनी शुक्रवारी सांगितलं की, चीनच्या राजदूताने अफगाणिस्तानसाठी परराष्ट्र मंत्रालयाचे 'पॉइंट पर्सन' जे. पी. सिंग यांच्याशी विस्तृत चर्चा केली.

First published:

Tags: Afghanistan, Bomb Blast, Taliban