Home /News /videsh /

या देशात आढळल्या 751 अज्ञात कबरी, चिमुकल्यांना मारुन शाळेच्या मैदानात पुरल्याची भीती; पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

या देशात आढळल्या 751 अज्ञात कबरी, चिमुकल्यांना मारुन शाळेच्या मैदानात पुरल्याची भीती; पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

उत्खननात सुमारे 751 कबरी सापडल्या आहेत. एकाही कबरीवर नावं नसल्याने इथे नेमकं काय झालं होतं, हे समजणं कठीण आहे. काही आठवड्यांपूर्वी अशाच प्रकारे अनेक कबरी सापडल्या होत्या.

  टोरंटो, 25 जून : कॅनडामध्ये (Canada) पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कबरी आढळल्या आहेत, ज्यावर कोणाचंही नाव नाही. सस्केचेवान प्रांतात पूर्वीच्या मॅरिवल इंडियन रेसिडेंशियल स्कूलमध्ये (Former Marieval Indian Residential School) उत्खनन करताना या कबरी सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. स्थानिक संस्था काउसेस नेशन फर्स्टने (Cowessess First Nation) सांगितलं, की उत्खननात सुमारे 751 कबरी सापडल्या आहेत. एकाही कबरीवर नावं नसल्याने इथे नेमकं काय झालं होतं, हे समजणं कठीण आहे. काही आठवड्यांपूर्वी अशाच प्रकारे अनेक कबरी सापडल्या होत्या. CNN रिपोर्टनुसार, काउसेस फर्स्ट नेशनचे प्रमुख कॅडमस डेलोर्मे यांनी असा संशय व्यक्त केला आहे, की या कबरींचे हेडस्टोन किंवा मार्कर जाणूनबुजून हटवले आहे, जेणेकरुन येथील सत्य कोणालाही समजू नये. तर दुसरीकडे आणखी एक संस्था Federation of Sovereign Indigenous First Nations चे प्रमुख बॉबी कॅमरुन यांनी सांगितलं, की कबरी पाहून इथे हत्याकांड झाल्याचं असू शकतं. सस्केचेवान प्रांतात कॉन्सन्ट्रेशन कँप होते, ज्याला भारतीय निवासी असं ओळखलं जात होतं. कॅनडाला एक असं राष्ट्र म्हणून ओळखलं जाईल ज्याने 'फर्स्ट नेशन' संपवण्याचा प्रयत्न केला. आता याचे पुरावेही मिळत असल्याचं, ते म्हणाले. 215 मुलांचे अवशेष सापडले होते - मे महिन्याच्या अखेरीस कॅनडातील एका दुसऱ्या बोर्डिंग स्कूलजवळ 215 मुलांचे अवशेष पुरलेले आढळले होते. या घटनेने मोठा गोंधळ उडाला होता. 3 वर्षांहून कमी वयाच्या मुलांना कमलूप्स इंडियन रेसिडेंशियल स्कूलच्या (Kamloops Indian Residential School) मैदानात पुरण्यात आलं होतं. वांशिक भेदभावामुळे त्यांना मारुन दफन करण्यात आल्याचं बोललं जातं. पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी दोन्ही स्कूलमध्ये आढळलेल्या कबरींची चौकशी केली जाईल असं म्हटलं होतं. एका रात्रीसाठी केलं होतं हायर, टेक टायकूनने कॉल गर्लसोबत थाटला होता संसार PM Trudeau यांनी स्कूलमध्ये आढळलेल्या कबरींवर दु:ख व्यक्त करत, ही प्रणालीगत वर्णद्वेष, भेदभाव आणि अन्यायाची एक लाजिरवाणी गोष्ट आहे, ज्याचा सामना त्या Indigenous Peoples लोकांनी केला असेल. आपल्याला इतिहासाचं हे काळं सत्य स्वीकारावं लागेल, असंही पंतप्रधान म्हणाले.

  (वाचा - किम जोंगची सटकली, मोबाईल वापरला म्हणून 10 जणांना जाहीर मृत्युदंडाची शिक्षा)

  स्थानिक संस्थांचं असं म्हणणं आहे, की पूर्वी कॅनडामध्ये वंशद्वेष आणि भेदभाव मोठ्या प्रमाणात होता. शाळेतील मुलांनाही यातून जावं लागत होतं. शाळांमध्ये आढळलेल्या या कबरी तेच दर्शवत आहेत. काउसेस फर्स्ट नेशनच्या मते, मुलांना या शाळांमध्ये जाण्यास भाग पाडलं जात होतं आणि त्यांना रोमन कॅथलिक बनवलं जात होतं.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Canada

  पुढील बातम्या