मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

किम जोंगची सटकली, मोबाईल वापरला म्हणून 10 जणांना जाहीर मृत्युदंडाची शिक्षा

किम जोंगची सटकली, मोबाईल वापरला म्हणून 10 जणांना जाहीर मृत्युदंडाची शिक्षा

चिनी नेटवर्कचा वापर करून देशाबाहेर फोन केल्याच्या कारणावरून उत्तर कोरियातील 10 जणांना मृत्युदंड देण्यात आला आहे. देशाबाहेर फोन न करण्याचा नियम मोडल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

चिनी नेटवर्कचा वापर करून देशाबाहेर फोन केल्याच्या कारणावरून उत्तर कोरियातील 10 जणांना मृत्युदंड देण्यात आला आहे. देशाबाहेर फोन न करण्याचा नियम मोडल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

चिनी नेटवर्कचा वापर करून देशाबाहेर फोन केल्याच्या कारणावरून उत्तर कोरियातील 10 जणांना मृत्युदंड देण्यात आला आहे. देशाबाहेर फोन न करण्याचा नियम मोडल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 24 जून: उत्तर कोरियाचा (North Korea) हुकुमशहा किम जोंग उनने (Kim-Jong-Un) उत्तर कोरियातील 10 जणांना मृत्युदंडाची (Death Penalty) घोषणा केलीय. या दहाजणांचा गुन्हा हा की त्यांनी मोबाईलवरून (Mobile) चिनी नेटवर्कचा (China Network) वापर करत देशाबाहेर फोन केला. उत्तर कोरियातील नागरिकांना मोबाईलवर चिनी नेटवर्कचा वापर करायला सक्त मनाई करण्यात आली आहे. एवढंच नव्हे, तर उत्तर कोरियाच्या बाहेर कुणीही, कुठल्याही कारणासाठी फोन करणं हा देशद्रोहाचा (Sedition) अपराध ठरवण्यात आला आहे.

उत्तर कोरियातील किम जोंग उनच्या पक्षानं आतापर्यंत मोबाईलवरून परदेशात फोन केल्याच्या गुन्ह्याखाली आतापर्यंत 150 जणांना अटक केलीय. मार्च महिन्यात याबाबत एक गुप्त शोधमोहिमच उत्तर कोरियाच्या पोलिसांनी राबवली आणि त्यात त्यांना 150 नागरिक दोषी आढळले होते. अजूनही देशाबाहेर फोन करणाऱ्या गुन्हेगार नागरिकांचा शोध पोलीस घेत असून वेगवेगळ्या भागात छापेमारीचं सत्र सुरूच असल्याची माहिती ‘डेलि एनके जपान’नं दिलीय.

मोबाईल वापरावर बंदी कशासाठी?

उत्तर कोरियात राहणाऱ्या अनेक नागरिकांचे नातेवाईक हे दक्षिण कोरियात राहतात. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी नागरिक छुप्या मार्गाने मोबाईलचा वापर करतात. मात्र उत्तर कोरियातील नेटवर्कचा वापर करून आंतरराष्ट्रीय कॉल करता येत नाहीत. त्यासाठी चिनी नेटवर्कचा वापर करून अनेक नागरिक नातेवाईकांशी संपर्क साधतात. मात्र यामुळे देशाबाबतच्या अनेक बाबी चीनसह इतर देशांना कळू शकतात, अशी भीती किम जोंग उन यांना वाटते. चिनी नेटवर्कचा वापर केला, तर इथले फोन टॅप करणं आणि काही गोपनिय माहिती बाहेर जाण्याची शक्यता असल्यामुळे कुणीही त्याचा वापर करू नये, असे आदेश उत्तर कोरियाच्या सरकारने दिले आहेत. 2004 ते 2008 या चार वर्षात तर मोबाईल बाळगणे हादेखील उत्तर कोरियात गुन्हा होता. मात्र त्यानंतर देशांतर्गत वापरासाठी काही अटींवर मोबाईलला परवानगी देण्यात आली.

हे वाचा - 'या' 11 देशांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचं थैमान, रुग्णांचा आकडा ऐकून बसेल धक्का

दुष्काळ आणि मोबाईल

उत्तर कोरियात सध्या भीषण दुष्काळ पडला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षांपासून उत्तर कोरियानं आपल्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे देशातील आयात पूर्णतः थांबली आहे. त्यात नुकत्याच येऊन गेलेल्या पुरामुळे अन्नधान्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यासाठी दक्षिण कोरियातील आपल्या नातेवाईकांकडे इथले नागरिक फोनवरून मदत मागतात आणि अनेक वस्तू पोहोचवण्याची विनंती करतात. त्यातील 10 जणांना मात्र असे फोन केल्यामुळे जिवाला मुकण्याची वेळ आली आहे.

First published:

Tags: Kim jong un, Mobile, North korea