मराठी बातम्या /बातम्या /विदेश /एका रात्रीसाठी केलं होतं हायर, त्यानंतर टेक टायकून Jhon McAfee ने कॉल गर्लसोबत थाटला होता संसार

एका रात्रीसाठी केलं होतं हायर, त्यानंतर टेक टायकून Jhon McAfee ने कॉल गर्लसोबत थाटला होता संसार

McAfee अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचे निर्माते जॉन मॅकेफी (Jhon McAfee) स्पेनमधील तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

McAfee अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचे निर्माते जॉन मॅकेफी (Jhon McAfee) स्पेनमधील तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

McAfee अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचे निर्माते जॉन मॅकेफी (Jhon McAfee) स्पेनमधील तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

    स्पेन, 24 जून : McAfee अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचे निर्माते जॉन मॅकेफी (Jhon McAfee) स्पेनमधील तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. टॅक्स चोरी आणि फसवणुकीच्या आरोपाखाली ते तुरुंगात होते. जॉन मॅकेफी आणि त्यांची पत्नी त्यांच्या लक्झरी आणि ग्लॅमरस लाईफस्टाईलसाठी चर्चेत राहायचे. जॉन मॅकेफी यांनी तीन लग्न केलीत. त्यांची तिसरी पत्नी ही कॉल गर्ल होती. याबाबत आज तकने वृत्त दिलंय.

    71 वर्षांचे जॉन मॅकेफी आणि त्यांची 34 वर्षांची पत्नी जेनिस डायसन यांच्या पहिल्या भेटीच्या प्रसंगावर तुमचा विश्वास बसणार नाही. तर, झालं असं की मॅकेफी यांनी जेनिसला एक दिवस आणि एक रात्र सोबत घालवण्यासाठी बोलावलं होतं, याबाबत मॅकेफी यांनी स्वतः एका कार्यक्रमात खुलासा केला होता.

    जेनिस लायसनला ग्वाटेमालाहून अमेरिकेत निर्वासित करण्यात आलं होतं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मियामी बीच कॅफेवर एक रात्र आणि एक दिवस सोबत घालवण्यासाठी मॅकेफी यांनी तिला कामावर ठेवलं होतं. यानंतर 2013 मध्ये जॉन मॅकेफी यांनी जेनिस डायसनसोबत लग्न केलं. त्यानंतर डायसनने स्वतःचं सरनेम बदलून मॅकेफी ठेवलं होतं. हे सर्व एका स्वप्नाप्रमाणे होतं असं जेनिस त्यावेळी म्हणाली होती.

    जॉन मॅकफी यांनी जेनिस डायसनला एका हिंसक दलालाला पासून आणि तस्करांपासून वाचवलं होतं. त्यानंतर मॅकेफी आपल्या दूर झालेल्या मुलाला पुन्हा भेटले आणि आयुष्याची नवीन सुरुवात केली. याबाबत त्यांच्या पत्नीने माहिती दिली होती. एका कार्यक्रमात जेनिसने सांगितलं होतं की मॅकेफीने माझ्यात मानवता पाहिली आणि मला दुसरी संधी मिळायला पाहिजे असं त्याला वाटलं. तर, याबद्दल मॅकफी म्हणाले होते की, ज्याचा शोध मी आयुष्यात घेत होतो ती गोष्ट मी जेनिस मध्ये पाहिली आणि तिच्याशी लग्न केलं.

    हे ही वाचा-Antivirus बनवणाऱ्या John McAfee यांचं निधन; तुरुंगात गळफास घेत संपवलं जीवन

    दरम्यान, जॉन मॅकेफी यांचं पहिलं लग्न कॉलेजमधील एका मुलीशी झालं होतं. त्यावेळी ते पीएचडी करत होते. त्यांच्या पहिल्या पत्नीने 1980 मध्ये मॅकेफीच्या ड्रग्सची (drugs) नशा आणि इतर वाईट सवयीमुळे (bad habbits) त्यांना सोडून दिलं होतं. 1983 मध्ये मॅकेफी पूर्णपणे एकटे झाले होते. ड्रग्सच्या सवयीमुळे त्यांनी स्वतःचं घर देखील विकलं आणि ते आयुष्यात अगदीच एकटे झाले होते, यावेळी त्यांनी आत्महत्या करण्याचाही विचार केला होता, असं मॅकेफी यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं.

    1986 मध्ये पाकिस्तानी कम्प्युटरचे व्हायरस (computer virus) अमेरिकन कम्प्युटर्स निकामी करत असल्याची बातमी मॅकेफीने वाचली. यानंतर त्यांनी कॅलिफोर्नियातील सांता क्लारा या घरून McAfee Associatesची सुरुवात केली. त्यांनी एक अँटीव्हायरस सॉफ्टवेअर ( anti-virus software) लॉन्च केलं आणि ते लोकांना फ्री उपलब्ध व्हावं, यासाठी त्याची मेसेंजिंग बोर्डवर जाहिरात दिली. त्यांची ही आयडिया भन्नाट चालली आणि ते अमेरिकेच्या प्रभावी लोकांच्या रांगेत जाऊन बसले. यानंतर त्यांनी सिलिकॉन व्हॅली मध्ये जुडी नावाच्या महिलेसोबत दुसरे लग्न केलं. त्यांनी 2000 मध्ये एक योग स्टुडिओ सुरू केला आणि त्यांनी स्वच्छ आणि आर्थिक घोटाळ्यात पासून मुक्त असं आयुष्य व्यतीत केलं.

    2009 मध्ये अमेरिकेत आर्थिक मंदी आली आणि याचा त्यांना खूप मोठा फटका बसला. त्यावेळी त्यांना त्यांची संपत्ती देखील विकावी लागली. याच काळात त्यांचा त्यांच्या दुसऱ्या पत्नीशी घटस्फोट झाला. यानंतर 2010 मध्ये त्यांना अनेक गर्लफ्रेंड होत्या, अनेक मुलींशी त्यांचे संबंध देखील राहिलेत. अखेर 2013 मध्ये त्यांनी कॉल गर्ल राहिलेल्या जेनिस डायसन सोबत लग्न केलं.

    First published:

    Tags: Spain, Suicide